For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रियलमी 15 टी स्मार्टफोन भारतात लाँच

07:00 AM Sep 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
रियलमी 15 टी स्मार्टफोन भारतात लाँच
Advertisement

7000 एमएएच क्षमतेची बॅटरी : 6.57 इंच डिस्प्ले : किंमत 20,999पासून

Advertisement

मुंबई : चीनी स्मार्टफोन कंपनी रियलमीने भारतात आपला नवीन मिड-रेंज 5 जी फोन रियलमी 15 टी लाँच केला आहे. या फोनमध्ये 7,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आणि पॉवरसाठी मीडियाटेक डायमेशन 6400 प्रोसेसर असणार आहे. याशिवाय, रियलमी 15 टी मध्ये 6.57-इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले आहे, जो 4,000 एनआयटीएस पर्यंत ब्राइटनेस देतो. फोटोग्राफीसाठी, 50 एमपी प्राथमिक कॅमेरा आणि 50 एमपी सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे. कंपनीने फोन तीन स्टोरेज आणि रॅम प्रकारांमध्ये लाँच केला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 6 सप्टेंबरपासून रियलमीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

Advertisement
Advertisement
Tags :

.