रियलमी 14टी 5जी स्मार्टफोन लाँच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिनी मोबाईल निर्माती कंपनी रियलमी यांनी आपला 14 टी हा नवा 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 17999 रुपये इतकी असणार असून मीडियाटेक डायमनसिटी 6300चा प्रोसेसर या मोबाईलला असणार आहे. या मोबाईलची बॅटरी 6000 एमएएच इतकी दमदार असणार आहे.
धूळ आणि पाणी रोधक असा हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या पर्यायासह उपलब्ध करण्यात आला आहे, या स्मार्टफोनची किंमत सुमारे 18 हजार रुपये इतकी असणार असून आणखीन एक स्मार्टफोन जो 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येणार आहे, त्याची किंमत सुमारे 20000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. सदरचे स्मार्टफोन हे कंपनीने हिरवा, काळा आणि जांभळा या तीन रंगांमध्ये सादर केला आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याचप्रमाणे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट त्याचप्रमाणे निवडक रिटेल विक्री केंद्रांवर हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे. काही बँकांच्या कार्डमार्फत हा फोन खरेदी केल्यास त्यांना सवलत प्राप्त करता येणार आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्यो
? 6.67 इंचाचा एफ एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले
? मीडियाटेक डायमनसिटी 6300चा प्रोसेसर
? 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर कॅमेरा