रिअलमी 12 प्रो 5जी स्मार्टफोन लाँच
पेरीस्कोप कॅमेरासोबत येणार फोन, 30 हजारात उपलब्ध
वृत्तसंस्था/ मुंबई
स्मार्टफोनच्या क्षेत्रात आघाडीवर राहू पाहणाऱ्या रिअलमीने आपला नवा रिअलमी 12 प्रो सिरीजअंतर्गत स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांसह हा स्मार्टफोन 30 हजाराच्या आत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
अत्यंत आकर्षक डिझाइन व फोटोग्राफीत कमाल करणारा रिअलमी 12 प्रो प्लस 5 जी स्मार्टफोन असणार आहे. कंपनीचा पेरीस्कोप कॅमेरासोबतच हा पहिलाच फोन असणार आहे, अशी माहिती कंपीनीकडून देण्यात आली आहे. वन प्लस या कंपनीने यापूर्वी सादर केलेल्या वरील कॅमेरासोबतच्या फोनची किंमत ही 65 हजार रुपये इतकी आहे. पण रिअलमीने तोच कॅमेरा घेत स्मार्टफोनची किंमत किफायतशीर ठेवली आहे. रिअलमी प्रो आणि रिअलमी प्रो प्लस असे दोन फोन्सचे प्रकार असणार आहेत. लेदर बॅक पॅनेलसोबतचा हा फोन बीज आणि निळ्या रंगात उपलब्ध असून 8 जीबी रॅम व 128 जीबी व यावरील स्टोरेजच्या पर्यायासह हे फोन येणार आहेत. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जन 2 व क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जन 1 हे प्रोसेसर फोनला असतील. 50 मेगापिक्सल, 64 मेगापिक्सल आणि फ्रंटसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा या फोन्समध्ये असेल. दोन्ही फोन्स अँड्रॉइड 14 वर चालणार असून 5000 एमएएचची बॅटरी 67 डब्ल्यूच्या चार्जरसोबत असतील. रिअलमी प्रोची किमत 27 हजार रुपयांच्या आत असेल तर प्रो प्लसची किंमत 30 हजार ते 34 हजार रुपयांपर्यंत प्रकारानुसार असणार आहे. सामान्यांना हा फोन खरेदीकरीता 6 फेब्रुवारीपासून उपलब्ध केला जाणार आहे.
वैशिष्ट्यो
प्रो, प्रो प्लस फोन
8 जीबी रॅम व 128 जीबी व वरील स्टोरेजसह
50 मेगापिक्सल, फ्रंटसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा
किंमत 30 हजार ते 34 हजार रुपयांपर्यंत
5000 एमएएचची बॅटरी 67 डब्ल्यूचा चार्जर
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जन 2 व क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जन 1 हे प्रोसेसर