महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चीनचा धोका ओळखून वेळीच सज्जतेची गरज

09:40 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘लोकमान्य को-ऑप.सोसायटी‘तर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात डॉ. डी. बी. शेकटकर यांचे आवाहन

Advertisement

पुणे : भारतीय लष्कराचे सामर्थ्य व सज्जता लक्षात घेता, त्यांना सीमेवर वा समोरासमोर पराभूत करणे अशक्य आहे. ही परिस्थिती व हतबलता लक्षात घेऊन चीन व पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्र युद्ध न करता भारताची अंतर्गत सुरक्षा कमकुवत करून व आपल्यात दुफळी माजवून ते त्यांचा हेतू साध्य करू इच्छित आहेत. हा गंभीर धोका नागरिकांनी वेळीच ओळखायला हवा. नागरिकांनी अशा शक्तींविरोधात सजगता दाखवून सज्ज राहायला हवे, असे आवाहन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर यांनी केले.सिक्कीम विश्वविद्यालयाचे कुलगुरु व लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर यांच्या ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’तर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा झाला. पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरुप होते. यावेळी व्यासपीठावर ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर व उपाध्यक्ष अजित गरगट्टी व पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव उपस्थित होते. या सोहळ्याला माजी लष्करी अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाकिस्तान, चीनसारखी शत्रूराष्ट्रे आपल्या देशातील वेगळे मते असणाऱ्या लोकांच्या मदतीने कटकारस्थान रचून पैशांच्या बळावर अंतर्गत कायदा सुव्यवस्था परिस्थिती व सुरक्षा कमकुवत करू पाहत आहेत. हा डाव वेळीच ओळखायला हवा, असेही डॉ. शेकटकर म्हणाले.

Advertisement

कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शेकटकर हे देशासाठीचे समर्पित योद्धा असल्याचे सांगत, निवृत्तीनंतरही आपल्या अभ्यासात सातत्य राखत, या वयातही संशोधन कार्य पूर्ण करीत तीन डॉक्टरेट मिळवल्या आहेत. त्यांनी केलेले संशोधन हे काळाच्या पुढचे असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख ठाकुर यांनी यावेळी केला.  दरम्यान सामान्य भारतीयांच्या मनात देश व लष्कराविषयी प्रेम, जिव्हाळा, जागरुकता निर्माण करण्याचे कार्य डॉ. शेकटकर करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ म्हणून आम्ही भरीव रक्कम देऊ करत असल्याचे प्रतिपादन ठाकुर यांनी प्रास्ताविकात केले. डॉ. शेकटकर यांनी ही रक्कम नाशिकस्थित सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटीला भोसला मिलिटरी स्कूलच्या नागपूर येथे चक्कीखापा भागात उभा राहत असलेल्या भारतीय प्रशासनिक सेवा पूर्वतयारी प्रशिक्षण वरिष्ठ महाविद्यालयाला मदत म्हणून जाहीर केली. प्रमुख पाहुणे बी. टी. पंडित यांनी आपल्या मनोगतात डॉ. शेकटकर यांच्या कारकिर्दीचा गौरव केला. डॉ. शेकटकर जरी आपल्याला गुरुस्थानी मानत असले तरी ते मला लहान भावासारखे असल्याचे पंडित यांनी सांगितले. महाजन यांनीही डॉ. शेकटकर यांच्या लष्करी कारकिर्दीतील आठवणी मांडल्या. ओंकार दीक्षित यांनी सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले तर विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article