‘रियल मी’चा ‘जीटी -7 प्रो’ पुढच्या महिन्यात होणार लाँच
वृत्तसंस्था/ मुंबई
चिनी स्मार्ट फोन कंपनी ‘रियल मी’ने पुढील महिन्यामध्ये आपला नवा स्मार्ट फोन ‘जीटी-7 प्रो’ भारतीय बाजारात दाखल करण्याचे निश्चित केले आहे. अनेक वैशिष्ट्याने हा स्मार्टफोन येणार असल्याचे बोलले जात आहे.
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 इलायट सिस्टीम चिपसह पहिला वहिला स्मार्टफोन कंपनी लाँच करीत आहे. अँड्रॉईड 15 या ऑपरेटिंग सिस्टीमवर सदरचा फोन चालणार असून गुगलच्या आर्टिफिशीयल इंटलिजेन्स वैशिष्ट्यांचा लाभ या फोनमध्ये ग्राहकांना घेता येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) एआय स्केच टू इमेज, एआय मोशन डेब्लर, एआय टेलिफोटो अल्ट्राक्लॅरिटी अशी वैशिष्ट्योसुद्धा जीटी-7 प्रोमध्ये देण्यात आलेली आहेत.
व्हिडीओ गेमचे चाहते असणाऱ्यांना हा फोन नक्कीच आवडणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचा स्मार्ट फोन चीनच्या बाजारात 4 नोव्हेंबर रोजी दाखल केला जात असून भारतात त्यानंतरच्या दिवसात लाँच होणार आहे.
स्मार्ट फोनची काही वैशिष्ट्यो पाहूया
? 6.78 इंचाचा ओएलईडी मायक्रोकर्व्हड डिस्प्ले
? अल्ट्रासेनिक फिंगर प्रिंट सेंन्सर
? 24 जीबी रॅम आणि1 टीबी स्टोअरेज
? 6500 एमएएचची दमदार बॅटरी
? 120 व्हॅटचा फास्ट चार्जर
? किंमत 50 ते 60 हजाराच्या घरात