For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रियल माद्रीदचे लक्ष्य जेतेपदावर

06:47 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
रियल माद्रीदचे लक्ष्य जेतेपदावर
Advertisement

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

Advertisement

स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर रियल माद्रीद संघाचे लक्ष्य राहिले आहे. दरम्यान त्यांचा पारंपारिक प्रतिस्पर्धी बार्सिलोना संघ असून या संघाचे रविवारी येथे आगमन झाले आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात बार्सिलोनापेक्षा रियल माद्रीद संघ 8 गुणांनी आघाडीवर आहे.

चार दिवसांपूर्वी चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मँचेस्टर सिटीने रियल माद्रीदचा पेनल्टीवर पराभव केला होता. आता बार्सिलोना संघाविरुद्धच्या सामन्यात रियल माद्रीदला जेतेपदासाठी अधिक जागृक रहावे लागेल. गेल्या जानेवारीमध्ये सौदी अरेबियात झालेल्या स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात रियल माद्रीदने बार्सिलोनाचा 4-1 असा पराभव केला होता. या लीग स्पर्धेत माद्रीद संघाने गेल्या 25 सामन्यांमध्ये एकही पराभव स्वीकारलेला नाही. बार्सिलोनाचा संघ हा विद्यमान लीग विजेता आहे. आता माद्रीदमध्ये सोमवारी होणाऱ्या सामन्यात बार्सिलोना संघ रियल माद्रीदवर विजय मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.