For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रीगन’चा ट्रेलर जारी

06:39 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रीगन’चा ट्रेलर जारी
Advertisement

40 व्या अमेरिकन अध्यक्षांचा पूर्ण प्रवास दाखविणार

Advertisement

अभिनेता डेनिस क्वॅडचा चित्रपट ‘रीगन’चा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक सीन मॅकनामारा यांचा हा बायोपिक 40 व्या अमेरिकन अध्यक्षांवर आधारित आहे. हा चित्रपट रीगन यांच्या बालपणापासून इलिनोइसच्या डिक्सनमध्ये हॉलिवूड आणि मग व्हाइट हाउसपर्यंतचा पूर्ण प्रवास दाखविणार आहे.

डेनिस क्वॅड या चित्रपटात रोनाल्ड रीगन यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रीगन यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखविल्या जाणार आहेत. यात बालपणी गुंडांचा केलेला सामना, अभिनयाची कारकीर्द, स्क्रीन अॅक्टर्स  गिल्डचे नेतृत्व, कम्युनिस्ट विरोधी वक्तव्यांमुळे राजकारणात सुरू झालेला प्रवास दाखविला जाणार आहे. ‘रीगन’मध्ये डेनिस क्वॅडसोबत नॅन्सी रीगनच्या स्वरुपात पेनेलोप एन मिल दिसून येणार आहे. तर रीगन यांची पहिली पत्नी जेन वायमन यांच्या व्यक्तिरेखेत मेना सुवारी झळकणार आहे. केविन डिलन देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत असतील.

Advertisement

रोनाल्ड रीगन यांच्यावर आधारित हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना संकटामुळे चित्रिकरण लांबले होते. आता सर्व अडथळ्यांवर मात करत हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

Advertisement
Tags :

.