For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजहंसगड येथील रेशन दुकान पूर्ववत सुरू करा

11:19 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजहंसगड येथील रेशन दुकान पूर्ववत सुरू करा
Advertisement

ग्रामस्थांच्यावतीने खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

Advertisement

धामणे : राजहंसगड येथील रेशन दुकान पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन राजहंसगड ग्रामस्थांच्यावतीने बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांना नुकतेच देण्यात आले. येथील रेशन दुकान मागील एक वर्षापासून बंद करण्यात आले आहे. राजकीय सुडबुद्धीने सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून या दुकानाबद्दल थातूरमाथूर कारणे देवून दुकान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. मागील आठ वर्षापासून विजय कुकडोळकर यांचे घर नं. 50/4 मध्ये रेशन वाटप करण्यात येत होते. त्यानंतर मागील वर्षापासून गावातील राजहंसगड ग्रामाभिवृद्धी आणि विविध उद्देश संघाकडे रेशन वाटपाचे अधिकार आले होते. आणि या संघाने पूर्वीच्या जागेवरच रेशन वाटपाचे काम सुरू होते. याबद्दल येथील नागरिकांची कसलीच तक्रार नव्हती. पण रेशन वाटप परवाना मिळताच अधिकाऱ्यांनी घर नं. 50/4 ऐवजी घर नंबर 90/4 हा पत्ता घातला. याचाच फायदा घेत गावातील एकाच्या नावाने तक्रार दाखल करून पत्ता बदलल्याचा ठपका ठेवत रेशन दुकान स्थगित ठेवण्यात आले आहे. तरी याबाबत खासदारांनी संबंधीत अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून रेशन दुकान पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून निवेदनात केली आहे. निवेदन देतेवेळी जोतीबा थोरवत, हणमंत नावगेकर, शंकर नागुर्डेकर, सिद्धाप्पा पवार, सुरेश थोरवत, महादेव चव्हाण, गणपत जाधव व इतर नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.