महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनपा आयुक्तांकडून निवारा केंद्राची पुन्हा पाहणी

10:24 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाण्याचा प्रवाह वाढल्यास काही कुटुंबांना स्थलांतरित करण्याची तयारी

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी येळ्ळूर रस्त्यावरील अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर, वडगाव परिसराला भेट देऊन पाहणी केली. तेथील निवारा केंद्रालाही भेट दिली. त्यानंतर बळ्ळारी नाला परिसराची पाहणी केली आहे. मात्र अद्याप तरी तेथील पाणी निचरा होण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले नाही. याबद्दल जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसामुळे शहरासह उपनगरांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. बळ्ळारी नाला परिसरात पूर आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी विविध परिसराला भेट देत आहेत. पाण्याचा प्रवाह वाढला तर तातडीने काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी निवारा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी या कुटुंबांना हलविण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व दक्षिण विभागातील प्रभागाचे महसूल निरीक्षक यल्लेश बचलपुरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article