महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आरसीबीचा गुजरातवर दणदणीत विजय

06:58 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

9 गडी राखून मात : सामनावीर विल जॅक्सचे नाबाद शतक, विराटचीही अर्धशतकी खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विल जॅक्सचे नाबाद शतक व विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चँलेजर्स बेंगळूरने गुजरात टायटन्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रारंभी, साई सुदर्शन आणि शाहरुख खानच्या खेळीच्या जोरावर गुजरातने 200 धावा केल्या. विराट कोहली आणि विल जॅक्सने 150 हून अधिक धावांची भागिदारी करत आरसीबीला 16 व्या षटकांतच विजय मिळवून दिला. विल जॅक्सने धोनी स्टाईलने सिक्स मारत आरसीबीला विजय मिळवून दिला आणि शतक देखील पूर्ण केले. या विजयासह आरसीबीचा संघ सहा गुणासह शेवटच्या स्थानी आहे तर गुजरातचा संघ सातव्या स्थानी आहे.

गुजरात टायटन्सने विजयासाठी दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, डु प्लेसिस 24 धावांवर बाद झाला. डु प्लेसिस बाद झाल्यानंतर विराटने विल जॅक्ससोबत 166 धावांची भागिदारी करुन संघाला 16 व्या षटकांतच विजय मिळवून दिला. विल जॅक्सने 41 बॉलमध्ये 5 चौकार व 10 षटकारासह नाबाद 100 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. जॅक्सने षटकार मारत शतक पूर्ण केलं त्याच बरोबर संघाला विजय मिळवून दिला. यंदाच्या आयपीएल हंगामात दमदार फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने 44 बॉलमध्ये 6 चौकार व 3 षटकारासह 70 धावांची खेळी केली. या जोडीने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. दरम्यान, आरसीबीचा हा सलग दुसरा विजय असून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा अजूनही कायम आहेत. गुजरातकडून साई किशोरला एक गडी बाद करता आला.

गुजरातचा सलग दुसरा पराभव

प्रारंभी, आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात स्वप्नील सिंगने सलामीवीर वृद्धिमान साहाला 5 धावांवर बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला. यानंतर कर्णधार शुभमन गिलही फार काळ मैदानावर टिकला नाही. त्याचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. 16 धावांवर त्याला मॅक्सवेलने पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर साई सुदर्शन व एम शाहरुख खान यांनी 86 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. साई सुदर्शनने 49 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारासह नाबाद 84 धावांची खेळी साकारली. शाहरुख खानने त्याला चांगली साथ देताना 30 चेंडूत 3 चौकार व 5 षटकारसह 58 धावांचे योगदान दिले. 28 वर्षीय शाहरुख खानच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलंच अर्धशतक आहे. त्याची यापूर्वीची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 47 होती. अर्धशतक झाल्यानंतर शाहरुखला सिराजने बाद केले. यानंतर डेव्हिड मिलरने 19 चेंडूत नाबाद 26 धावा जमवल्या. साई सुदर्शन, शाहरुखा खानच्या या दमदार खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावत 200 धावा केल्या. आरसीबीकडून  स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज व मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स 20 षटकांत 3 बाद 200 (वृद्धीमान साहा 5, शुभमन गिल 16, साई सुदर्शन 49 चेंडूत नाबाद 84, शाहरुख खान 58, डेव्हिड मिलर नाबाद 26, मॅक्सवेल, सिराज व स्वप्नील सिंग प्रत्येकी एक बळी). आरसीबी 16 षटकांत 1 बाद 206 (विराट कोहली 44 चेंडूत 70, डु प्लेसिस 24, विल जॅक्स 41 चेंडूत नाबाद 100, साई किशोर 1 बळी).

यंदाच्या आयपीएल हंगामात विराटच्या 500 धावा

आयपीएलच्या 17 व्या सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने गुजरातविरुद्ध 44 चेंडूत 70 धावांची खेळी साकारली. त्याचे हे यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक ठरले. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात पाचशे धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये अशी कामगिरी त्याने सातव्यांदा केली आहे. यंदाच्या हंगामात विराटने 10 सामन्यात 1 शतक व चार अर्धशतकासह 500 धावा केल्या आहेत. आँरेज कॅपच्या शर्यतीत विराटच अव्वल असून त्याच्या जवळपास एकही खेळाडू नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article