मुंबईसमोर आज आरसीबीचे आव्हान
प्रतिनिधी/ मुंबई
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज सोमवारी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्धच्या सामन्यात आपले फलंदाज जबाबदारी स्वीकारून कामगिरी करतील, अशी आशा संघर्ष करणाऱ्या मुंबई इंडियन्सना असेल. चार सामन्यांमध्ये तीन पराभवांमुळे मुंबई इंडियन्सची आणखी एक खराब सुऊवात झाली आहे. त्यांना फलंदाजीच्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून चार सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त सूर्यकुमार यादव आणि रायन रिकल्टन या दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आहेत.
मुंबईच्या फलंदाजीतील संघर्षाच्या केंद्रस्थानी माजी कर्णधार रोहित शर्मा आहे, जो सरावावेळी गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे लखनौ सुपर जायंट्सविऊद्धचा मागील सामना खेळू शकला नव्हता. मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आलेले नाही. आरसीबीविऊद्धच्या सामन्यासाठी रोहित तंदुऊस्त आहे की नाही हे पाहावे लागेल. परंतु मुंबईला त्यांच्या फलंदाजीतील अडचणींवर त्वरित उपाय शोधावा लागेल आणि त्यादृष्टीने सूर्यकुमारला आपली जोरदार कामगिरी सुरू ठेवावी लागेल. 177 धावांसह तो या हंगामातील आतापर्यंतचा मुंबईचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे.
आरसीबीसमोर मुंबईच्या फलंदाजीतील कच्च्या दुव्यांचा फायदा घेण्याची आणि त्यांच्या या प्रतिस्पर्ध्यांवर अधिक दबाव टाकण्याची संधी आहे. त्यांच्या विराट कोहलीने केकेआरविऊद्ध नाबाद 59 धावा करून या आयपीएलची सुऊवात चांगल्या पद्धतीने केली, परंतु तेव्हापासून तो संघर्ष करत आला आहे.
परंतु आरसीबीकडे मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक शक्ती फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, कर्णधार रजत पाटीदार यांच्या रुपाने उपलब्ध आहे. या संघातील टिम डेव्हिड हाही एक महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. आरसीबीकडे जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासारखे प्रभावी वेगवान गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्या फिरकी गोलंदाजांना अद्याप छाप पाडता आलेली नाही. आरसीबी गुणतक्त्यावर तिसऱ्या स्थानावर आहे आणि गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून झालेल्या पराभवातून सावरण्यास ते उत्सुक असतील.
संघ
मुंबई इंडियन्स-हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हान जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर-रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लियाम लिव्हिंगस्टोन, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मनोज भंडागे, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, यश दयाल.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.