‘आरसीबी’चा आज लखनौशी मुकाबला
वृत्तसंस्था/लखनौ
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज शुक्रवारी आरसीबी व एलएसजी हे दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आपली प्ले-ऑफची पात्रता निश्चित करण्याचा प्रयत्न करेल, तर संघर्षरत लखनौ सुपर जायंट्स स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचे लक्ष्य बाळगेल. एलएसजीचा कर्णधार रिषभ पंतवर प्रत्येक सामन्यागणिक दबाव वाढत आहे. त्याची धावांची कमतरता संघाच्या घसरणीशी जुळत आहे. एलएसजीने गेल्या पाचपैकी चार सामने गमावले आहेत आणि उर्वरित तीन सामने जिंकल्यासच त्यांना फक्त 16 गुण मिळू शकतात. प्ले-ऑफ शर्यतीत 18 गुण हा एक सुरक्षित आकडा आहे आणि आरसीबीने त्यांच्या गेल्या सहा सामन्यांपैकी पाच जिंकलेले असल्याने त्या टप्य्यात पोहोचण्याची त्यांना चांगली संधी आहे. आयपीएल लिलावात सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू बनलेल्या पंतसाठी हा हंगाम आतापर्यंत विसरण्यासारखा राहिला आहे. त्याने वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु सातत्य त्याला दाखवता आलेले नाही. त्याचा 99.92 हा स्ट्राईक रेट या हंगामातील त्याच्या संघर्षाची साक्ष देतो. एलएसजी त्यांच्या पहिल्या तीन फलंदाजांवर म्हणजे मिशेल मार्श, एडन मार्करम आणि निकोलस पूरन यांच्यावलर खूप अवलंबून आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, स्वस्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, फिलिप सॉल्ट, मनोज भंडागे, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, यश दयाल, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, मोहित राठी, अभिनंदन सिंग.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.