For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘आरसीबी’ला आज पंजाबविरुद्ध गोलंदाजांकडून अधिक अपेक्षा

06:51 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आरसीबी’ला आज पंजाबविरुद्ध गोलंदाजांकडून अधिक अपेक्षा

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या आयपीएल मोहिमेतील फक्त एक सामना झालेला आहे. परंतु त्याने आधीच त्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे गोलंदाजीतील ठिसूळपणा उघडकीस आणला आहे. येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज सोमवारी आत्मविश्वासाने भरलेल्या पंजाब किंग्जचा सामना करताना त्यांना गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

चेन्नई सुपर किंग्जविऊद्ध स्वीकाराव्या लागलेल्या पराभवात वेगवान गोलंदाजांनी विचार न करता आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा केला, तर फिरकीपटूंकडे हळूहळू संथ होत चाललेल्या चेपॉकवरील खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी पुरेशी संसाधने नव्हती, असे दिसून आले. आरसीबीचे तीन फिरकीपटू मयंक डागर, कर्ण शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मिळून पाच षटके टाकली आणि फलंदाजांना कसलाही त्रास ते देऊ शकले नाहीत. त्यांना 37 धावा देऊन एक गडी टिपता आला.

Advertisement

याउलट सीएसकेचे दोन फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि महीश थिक्षाना यांनी आठ षटके टाकून 57 धावांच्या मोबदल्यात जेव्हा चार गडी टिपले तेव्हा फलंदाजी करणे खूपच सोपे होते. रॉयल चॅलेंजर्सच्या फिरकीपटूंना येथे अधिक कठीण कामासाठी सज्ज व्हावे लागेल. कारण येथे जवळ असलेल्या सीमारेषा आणि वेगवान आऊटफिल्ड हे त्यांना अनुकूल राहणार नाही. एका डावात 200 पेक्षा जास्त धावा सर्वाधिक म्हणजे 27 वेळा काढल्या जाण्याचा विक्रम या ठिकाणी आहे.

Advertisement

आरसीबीचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल यांनी चेन्नईविऊद्ध प्रति षटकात दोन बाऊन्सरचा कोटा आवेशाने वापरला, परंतु असे करताना त्यांनी नियंत्रण गमावले. चौथा वेगवान गोलंदाज कॅमेरॉन ग्रीनने दोन बळी मिळवून देणारे कटर वापरले, परंतु त्याने प्रति षटक सरासरी नऊ धावा दिल्या. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांना आपले कौशल्य प्रभावीपणे वापरावे लागेल.

चेन्नईविरुद्ध आरसीबीची 5 बाद 78 अशी घसरण झाली होती. दिनेश कार्तिक व अनुज रावत यांच्यामुळे त्यांना 170 चा टप्पा ओलांडता आला. पण तळाकडच्या फलंदाजांवर अवलंबून राहणे रोज मदतकारी ठरणारे नाही. त्यामुळे कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेलसारख्या वरिष्ठ खेळाडूंना मोठे डाव खेळावे लागतील. रजत पाटीदारकडूनही अधिक फलदायी खेळाची अपेक्षा असेल. पंजाबने आपली सक्षम बाजू शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध दाखविलेली आहे. मात्र जॉनी बेअरस्टोने गमावलेला फॉर्म आणि डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करनची दिशाहीन गोलंदाजी ही त्यांच्यासाठी समस्या आहे.

संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंह, सौरव चौहान.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वत कावेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा. 

Advertisement
Tags :
×

.