आरसीबी-दिल्लीदरम्यान आज तुल्यबळ लढत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएलमध्ये आज रविवारी फॉर्ममध्ये असलेले दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात सामना होणार असून यावेळी विराट कोहली व के. एल. राहुल आपापल्या संघाच्या लढाईचे नेतृत्व करतील, तर गोलंदाजीत मिशेल स्टार्क विऊद्ध जोश हेझलवूड असा सामना रंगेल. दिल्ली आणि आरसीबी हे दोघेही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने फिरोजशाह कोटलावरील दोन गुण विजेत्या संघाला लक्षणीय मदत करतील.
कोहली हे आजच्या लढतीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्या राहणार आहे. कारण तो नऊ सामन्यांत झळकावलेल्या पाच अर्धशतकांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या ’होमग्राऊंड’वर परतणार आहे. या हंगामात मंदगतीच्या खेळपट्ट्यांमुळे फटकेबाजी कठीण झालेली आहे. परंतु कोहली या आव्हानावर मात करण्यात यशस्वी झाला आहे. या परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणारा आणखी एक फलंदाज म्हणजे राहुल. त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
गोलंदाजीत हेझलवूड आणि स्टार्क या दोन ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या प्रचंड मोठ्या मूल्यास साजेशी कामगिरी केली आहे. हेझलवूड 16 बळींसह गोलंदाजांमध्ये आघाडीवर आहे आणि त्याने राजस्थान रॉयल्सविऊद्धच्या मागील सामन्यात 19 व्या षटकात आरसीबीला विजय मिळवून दिला. त्याचा देशबांधव स्टार्कही फार मागे नाही. याशिवाय दोन्ही बाजूंच्या फिरकी गोलंदाजांमध्येही यानिमित्ताने लढत रंगणार आहे.
आठ सामन्यांमध्ये 12 बळी घेतलेल्या कुलदीपच्या गुगलीने संपूर्ण आयपीएलमध्ये मधल्या षटकांत फलंदाजांना चकमा दिला आहे. फॉर्मात असलेल्या आरसीबी फलंदाजांसमोर कुलदीपचे सर्वांत मोठे आव्हान असेल. दुसरीकडे, दिल्लीच्या सुयश शर्माने आरसीबीच्या जर्सीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नेतृत्व चांगले केले असले, तरी त्याने दुखापतीमुळे स्पर्धेत जास्त गोलंदाजी केलेली नाही. परंतु गेल्या सामन्यात त्याने षटकांचा कोटा पूर्ण केला. हे संघासाठी आणखी एक सकारात्मक लक्षण आहे. 12 बळी घेतलेला कृणाल आरसीबीसाठी अशीच भूमिका बजावेल. जेक-फ्रेझर मॅकगर्कला वगळल्यापासून दिल्ली फक्त तीन परदेशी खेळाडूंना खेळवत आला आहे आणि अभिषेक पोरेल व कऊण नायर सलामीला येऊन तीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
संघ : दिल्ली कॅपिटल्स-अक्षर पटेल (कर्णधार), कऊण नायर, हॅरी ब्रूक, जॅक-फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, डोनोवन फेरेरा, के. एल. राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय जाधव मंडल, विप्रज निगम, मानवंथ कुमार एल., त्रिपुराना विजय, माधव तिवारी, कुलदीप यादव, दुष्मंथ चमीरा, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार.
आरसीबी-रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, स्वस्तिक चिकारा, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, फिल सॉल्ट, मनोज भंडागे, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, यश दयाल, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, मोहित राठी, अभिनंदन सिंग.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.