आरबीआय : पेमेंट सिस्टम सुधारण्यासाठी नवे नियम
फसवणूक व अन्य प्रकार थांबविण्यासाठी बँकेची मार्गदर्शक तत्वे सादर
मुंबई :
देशात ऑनलाइन पेमेंटचे पर्याय वाढत आहेत. यासोबतच बनावट कागदपत्रे बनवण्याच्या घटनाही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पेमेंट सिस्टम मजबूत करण्यासाठी हे नियम सादर करण्यात आले आहेत. नॉन-बँक पेमेंट सिस्टमशी संबंधित संशयास्पद व्यवहार ओळखण्यात मदत होणार असल्याची माहिती आहे.
मूलभूत दिशानिर्देशाचे पालन आवश्यक
डिजिटल पेमेंट सुरक्षा नियंत्रणासाठी आरबीआयने जारी केलेली सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागणार आहेत. आरबीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की नॉन-बँक पेमेंट व्यवस्थेचे पालन केले पाहिजे. गैर बँकिंगशी संबंधीत एखादा व्यवहार असेल तर तो आपोआप सदरचे अॅप्लीकेशन बंद होण्याची व्यवस्था असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. जर ग्राहकांना मोबाईल अॅप्लिकेशन पुन्हा वापरायचे असेल तर त्यांना पुन्हा लॉगिन करावे लागेल.
रिझर्व्ह बँक ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सायबर मजबुतीवर भर देणार आहे. ग्राहकांच्या सुरक्षेकरीता आवश्यक त्या उपाययोजना तयार केल्या जात आहेत.