For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेमंड : रियल्टी व्यवसाय वेगळा करण्यास मान्यता

07:01 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेमंड   रियल्टी व्यवसाय वेगळा करण्यास मान्यता
Advertisement

रेमंडचे समभाग 15 टक्क्यांनी मजबूत : संचालक मंडळाकडून हिरवा कंदील

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

रेमंडपासून रियल्टी व्यवसाय वेगळे करण्यास मान्यता दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती. सकाळी 11 वाजता शेअरबाजारात रेमंड लिमिटेडचे समभाग 15.37टक्के वाढीसह 3,391.80 वर व्यवहार करत होते. कंपनीच्या संचालक मंडळाने 4 जुलै रोजी रियल्टी व्यवसायाला डिमर्जरला मान्यता दिली. रेमंडने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, या डिमर्जर योजनेचा उद्देश रिअल इस्टेट विभागातील वाढीच्या संभाव्यतेचा फायदा घेणे आणि नवीन गुंतवणूकदार आणि धोरणात्मक भागीदारांचा सहभाग सुनिश्चित करणे हा आहे.

Advertisement

रेमंडच्या भागधारकांना 1:1 च्या प्रमाणात शेअर्स रेमंड रियल्टीचे शेअर्स डिमर्जर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर स्वतंत्र युनिट म्हणून सूचीबद्ध केले जातील. त्याच वेळी, रेमंडच्या भागधारकांना प्रत्येक शेअरमागे रेमंड रियल्टीचा एक हिस्सा मिळेल.

कंपनीने म्हटले आहे की हे धोरणात्मक पाऊल अशावेळी घेतले आहे जेव्हा रेमंडच्या रिअल इस्टेट व्यवसायाने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1,593 कोटी कमाईची अपेक्षा केली आहे, जी वार्षिक 43 टक्के इतकी वाढ आहे. स्वतंत्र युनिट म्हणून त्याचा विकास अधिक चांगल्या प्रकारे निर्धारित करण्याच्या स्थितीत आहे.

रेमंड रियल्टीकडे ठाण्यात 11.4 दशलक्ष चौरस फूट रेरा मंजूर क्षेत्रासह 100 एकर जमीन आहे. त्यापैकी सुमारे 40 एकर जागेचा विकास सुरू आहे. ठाण्यात नऊ हजार कोटी रुपयांचे पाच प्रकल्प सुरू आहेत.

6 महिन्यात समभागांचा 96 टक्के परतावा

मागील 5 दिवसात रेमंडच्या शेअरमध्ये 10 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 1 महिन्यात 58.40 टक्के आणि 6 महिन्यात 96.84टक्के सकारात्मक परतावा समभागाने दिला आहे. रेमंडच्या समभागांनी गेल्या 5 वर्षांत 370 टक्केपेक्षा जास्त परतावा दिला आहे.

रेमंड विविध व्यवसायात

रेमंड ग्रुप रिअल इस्टेटसह इतर व्यवसायांसह कापड, डेनिम, ग्राहक सेवा आणि अभियांत्रिकी यात सक्रीय आहे. रेडिमेड कपड्यांच्या बाजारात कंपनीचे मजबूत अस्तित्व आहे. डेनिम श्रेणीतील ही आघाडीची उत्पादक कंपनी आहे. कंपनी उच्च दर्जाचे डेनिम पुरवते.

Advertisement
Tags :

.