कोर्टरुम ड्रामा सीरिजमध्ये रविकिशन
‘मामला लीगल है’मध्ये मुख्य भूमिकेत
भोजपुरी सुपरस्टार रविकिशन आता ‘मामला लीगल है’ सीरिजद्वारे प्रेक्षकांना हसविणार आहे. या सीरिजमध्ये कायदेशीर डावपेच दाखविले जाणार असल्याने याला कोर्टरुम ड्रामा कॉमेडी वेबसीरिज संबोधिण्यात येत आहे.
जॉली एलएलबी यासारख्या चित्रपटांद्वारे कोर्टरुम ड्रामा कॉमेडीचा प्रेक्षकांनी यापूर्वीच आनंद घेतला आहे. आता त्याच मार्गावर जात मामला लीगल ही सीरिज प्रेक्षकांच्या मनोरंजनाला दुप्पट करणार आहे. मामला लीगल सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटीव प्लॅटफॉर्मवर 1 मार्च रोजी स्ट्रीम करण्यात येणार आहे. राहुल पांडे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. तर सौरभ खन्ना आणि कुणाल जनेजा यांनी याची कहाणी लिहिली आहे.
या सीरिजमध्ये दिल्लीच्या पडपडगंज जिल्हा न्यायालयातील कोर्टरुम ड्रामा दर्शविण्यात येणार आहे. रविकिशन यात पटपडगंज बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.डी. त्यागी ही व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहेत. यात निधी बिष्ट, नायला ग्रेवा, विजय राजोरिया आणि अंजुम बत्रा हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहे.