For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलपी हायस्पीड ट्रॉलर्सच्या अतिक्रमणाविरोधात आर या पारची लढाई लढू

12:08 PM Oct 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मलपी हायस्पीड ट्रॉलर्सच्या अतिक्रमणाविरोधात आर या पारची लढाई लढू
Advertisement

रविकिरण तोरसकर यांचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

मलपी कर्नाटक येथील हायस्पीड ट्रॉलर्सच्या अतिक्रमणा विरोधात आर या पारची लढाई लढणार असा इशारा रविकिरण तोरसकर यांनी दिला आहे. कर्नाटकच्या हायस्पीड ट्रॉलरवर लाक्षणिक तसेच गरज पडल्यास आमरण उपोषण करणार आहे असेही म्हटले आहे.सिंधुदुर्ग व महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गेले कित्येक वर्ष मलपी कर्नाटक येथील हाय स्पीड ट्रॉलरची खुसखोरी होत आहे .त्यामुळे सागरी जैवविविधतेचे अतोनात नुकसान होत असून महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या तोंडचा घास पळवून नेला जात आहे. सदर बेकायदेशीर मासेमारी संदर्भात मच्छीमारांच्या विविध संघटनांनी वेळोवेळी निवेदन ,उपोषण व आंदोलनाद्वारे आपला आवाज उठवला आहे. कर्नाटकातील या हाय स्पीड ट्रॉलरची मजल सागरी गस्त करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत गेली आहेत. तसेच लाखो रुपयांची स्थानिक मच्छीमारांची मासेमारी करण्याची जाळी या ट्रॉलर्सनी तोडून नेली आहे. नुकताच मलपी येथील बेकायदेशीर मासेमारी करणारा हायस्पीड ट्रॉलर्स सिंधुदुर्गच्या सागरी जलधीक्षेत्रामध्ये मत्स्य खात्याने पकडला होता. त्यामध्ये सुमारे सहा टन मासे आढळून आले होते. अशा प्रकारचे शेकडो ट्रॉलर्स सध्या सिंधुदुर्ग व उर्वरित महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालून झुंडीने येत दहशत निर्माण करीत आहेत .त्यांच्या या झुंडशाहीमुळे मच्छीमारांचे जीव धोक्यात आले आहेत .शासन दरबारी याची नोंद घेऊन ज्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे त्या प्रकारे होत नाही आहे. याकडे तात्काळ लक्ष वेधून वेगवान कारवाई करण्यासाठी सर्जेकोट बंदरात मत्स्य व्यवसाय खात्याच्या ताब्यात असलेल्या हाय स्पीड ट्राॅलर वर आज लाक्षणिक उपोषण सुरू करीत आहे .गरज पडल्यास आमरण उपोषण सुरू करणार आहे. तरी सर्व मच्छीमारांना आवाहन आहे की त्यांनी आपापसातील वाद व भेदभाव बाजूला ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन करीत आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आहे. असा इशारा आम्ही देत आहे असेरविकिरण चिंतामणी तोरसकर मच्छिमार संघटना प्रतिनिधी यांनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.