For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकवली शहरातील आरबी बेकर्ससह मेडिकल स्टोअरला मोठी आग

06:56 AM Nov 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कणकवली शहरातील आरबी बेकर्ससह मेडिकल स्टोअरला मोठी आग
Advertisement

कणकवली | प्रतिनिधी 

Advertisement

कणकवली शहरातील  अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकात असलेल्या आरबी बेकरीसह एक मेडिकल स्टोअर आणि एका खाजगी ऑफिसला आग लागून मोठे नुकसान झाले. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कणकवली तसेच कुडाळ नगरपंचायत व कुडाळ एमआयडीसी येथे अग्निशमन बुंब आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना ही आग दिसून आली .त्यांनी तातडीने बेकरीच्या मागे असलेल्या राजू, गौरव गवाणकर यांना उठवून याबाबत कल्पना दिली. त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ,आग अधिकच भडकत गेली. त्यात वीज गेल्याने आणखी समस्या येत होती. शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज  व्यक्त होत आहे.आर बी बेकर्स यांचा दुकानातील संपूर्ण फर्निचर, बेकरी माल जळून खाक झाला. तर बेकरीच्या मागील राजू गवाणकर यांचे कार्यालय आणि कार्यालयालगत असलेल्या बर्डे यांच्या मेडिकल स्टोअर मधील साहित्याचे ही मोठे नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस नगरपंचायत, महसूल प्रशासन दाखल झाले होते. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मालवण नगरपालिकेची अग्निशमन गाडी ही दाखल झाली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.