रवि दुबे-सरगुनच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा
संजय मिश्रा महत्त्वाच्या भूमिमकेत
अभिनेता-निर्माता रवि दुबे आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री सरगुन मेहताने स्वत:चे प्रॉडक्शन हाउस ड्रीमियाता ड्रामाच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी स्वत:चे नवे वर्टिकल ‘ड्रीमियाता ड्रामा डिस्कव्हरी’चीही घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत एक चित्रपट निर्माण करणार असून यात दिग्गज अभिनेते संजय मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.
रवि दुबेने एक पोस्ट शेअर केली असून यात एक पोस्टर आहे, ज्यात संजय मिश्रा दिसून येत आहेत. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर सिंडिकेटेड कंटेंट दाखविणार आहोत. यात ‘चंपा लीला’ हा पहिला प्रकल्प असून संजय मिश्रांचा दमदार अभिनय पाहता येणार असल्याचे रवि दुबेने म्हटले आहे.
रवि आणि सरगुनचा हा नवा प्रोजेक्ट ड्रीमियाता ड्रामाच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. टीव्ही मालिकांद्वारे कारकीर्द सुरू करणारे रवि दुबे आणि सरगुन मेहता यांनी आता निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकले आहे. दोघांनी अनेक म्युझिक व्हिडिओ, टीव्ही मालिका आणि वेब शो निर्माण केले आहेत. अलिकडेच दोघांनी एका शोची घोषणा केली होती.