For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘डायनेस्टी’मध्ये रविना टंडन

06:01 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘डायनेस्टी’मध्ये रविना टंडन
Advertisement

दिग्गज गायक तलत अजीजसोबतचा प्रोजेक्ट

Advertisement

90 च्या दशकातील मुख्य अभिनेत्री राहिलेली रविना टंडन अद्याप चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. रविना आता ओटीटीवर स्वत:च्या अभिनयाची जादू दाखवित आहे. ‘अरण्यक’ आणि ‘पटना शुक्ला’ यासारख्या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारल्यावर रविना आता ‘डायनेस्टी’मध्ये दिसून येईल.

पटना शुक्ला या सीरिजमध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली होती. तर आता ती पॉलिटिकल ड्रामा सीरिजमध्ये अभिनय करणार आहे. रविनासोबत या सीरिजमध्ये दिग्गज गायक तलत अजीज देखील दिसून येणार आहे.

Advertisement

डायनेस्टी ओटीटीवरील रविनाची पाचवी सीरिज ठरणार आहे. साहिल संघा यांच्या दिग्दर्शनातील या सीरिजचे चित्रिकरण दिल्लीत पार पडणार आहे. चालू महिन्यातच याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. रविना आगामी काळात ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातही दिसून येणार आहे. दुसरीकडे रविनाची मुलगा राशा ही देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

Advertisement
Tags :

.