24 वर्षांनी तमिळ चित्रपटसृष्टीत रविना
विजय एंटनीच्या चित्रपटात मुख्य भूमिका
बॉलिवूडची मस्त-मस्त गर्ल रविना टंडन ही आजही चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. रविना आता 24 वर्षांनी तमिळ चित्रपटसृष्टीत परतणार आहे. दिग्दर्शक जोशुआ सेथुरमनच्या नव्या चित्रपटात ती दिसून येणार आहे. रविना ही तमिळ चित्रपट ‘लॉयर’मध्ये काम करणार आहे. या चित्रपटात तमिळ स्टार विजय एंटनी प्रमुख भूमिकेत आहे.
बॉलिवूडमधील काही मित्रांद्वारे मी रविनाशी संपर्क साधला होता. रविनाने माझा पूर्वीचा चित्रपट पाहिल्यावर त्यांना माझ्या कार्यशैलीची कल्पना आली. त्यानंतर मी त्यांना पटकथा ऐकविली आणि यात त्यांनी रुची दाखविल्याचे दिग्दर्शक जोशुआने सांगितले. रविना टंडनने यापूर्वी 2001 साली प्रदर्शित तमिळ चित्रपट ‘आलवंधन’मध्ये काम केले होते. सुरेश कृष्णकडून दिग्दर्शित या चित्रपटात कमल हासन, मनीषा कोइराला, अनु हसन, किटू गिडवाणी आणि सरथ बाबू प्रमुख भूमिकेत होते. रविनाने बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू चित्रपटातही काम केले आहे. तसच तिने केजीएफ 2 या कन्नड चित्रपटातही अभिनय केला होता. रविना आगामी काळात ‘इन गलियों में’ या चित्रपटात दिसून येणार आहे.