महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उंदरांमुळे बेटावर घडविणार बॉम्बस्फोट

06:22 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यावरणाला होणार लाभ

Advertisement

जर एखाद्या बेटावर कुठलाही देश बॉम्बवर्षाव करण्याची योजना आखत असेल  तर त्यामागे कारण काय असू शकते? कुठल्या अन्य देशावर आक्रमण करण्याचा विचार असेल असे तुम्हाला वाटेल. परंतु हा प्रकार पर्यावरणाच्या रक्षणासाठी होणार आहे. दक्षिण आफ्रिका स्वत:च्याच बेटावर बॉम्बवर्षाव करण्याची तयारी करत आहे. यामागील उद्देश उंदरांचे अस्तित्व संपविणले आहे. या उंदरांमुळे हजारोंच्या र्सख्येत अल्बाट्रॉस पक्षी मारले जात आहेत.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेत मॅरियन हे बेट केप टाउनपासून सुमारे 2 हजार किलोमीटर अंतरावर आहे. तेथे बॉम्बवर्षाव करत उंदरांना नष्ट केले जात आहेत. या बेटावर या उंदरांकडून सागरी पक्ष्यांना लक्ष्य केले जात आहे. याचमुळे दक्षिण आफ्रिका सरकारने जगातील सर्वात महत्त्वपूर्ण पक्षी संरक्षण पुढाकार हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे नाव माउस-फ्री मॅरियन प्रोजेक्ट ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या हिस्स्याच्या स्वरुपात हेलिकॉप्टर्सना पूर्ण बेटावर 600 टन उंदिर मारणाऱ्या रसायनाने युक्त छर्रे फैलावणे किंवा बॉम्ब फेकण्यासाठी तैनात केले जाणार आहे. प्रकल्पाला अद्याप निधी प्राप्त झालेला नाही, परंतु आवश्यक रकमेच्या  एक चतुर्थांश निधी जमविण्यात आला आहे. 2027 च्या हिवाळ्यात उंदरांवर हल्ला करण्याची योजना आहे, हिवाळ्यात उंदिर सर्वाधिक भुकेले असतात आणि उन्हाळ्यात प्रजनन करणारे पक्षी तेथे पोहोचलेले असतात. 25 किलोमीटर लांब आणि 17 किलोमीटर रुंद असलेलया बेटाचा प्रत्येक इंच व्यापला गेला तरच ही मोहीम यशस्वी होणार आहे.

अखेरच्या उंदरापासूनही मुक्ती मिळवावी लागणार आहे. मॅरियन बेट हे अनेक सागरी पक्ष्यांच्या घरट्याच्या निर्मितीचे ठिकाण आहे. यात अल्बाट्रॉस देखील सामील आहे, परंतु आता हा पक्षी धोक्यात आहे, कारण उंदरांचे समूह या पक्ष्यांवर हल्ले करत त्यांची अंडी फस्त करत आहेत अशी माहिती बर्डलाइफ साउथ आफ्रिकेच्या एका बैठकीत पक्षीतज्ञ मार्क एंडरसन यांनी दिली. माउस-फ्री मॅरियन प्रोजेक्टनुसार बेटावर सागरी पक्ष्यांच्या 29 प्रजातींपैकी 19 स्थानिक प्रजाती विलुप्त होण्याच्या धोक्याला तोंड देत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article