महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तरूणीवरील अत्याचाराने रत्नागिरी हादरली! चंपक मैदान परिसरात पडली बेशुध्दावस्थेत

02:27 PM Aug 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

जिल्हा रूग्णालयात दाखल, परिचारिकांची निदर्शने, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको; भरदिवसा घडलेल्या घटनेने जनमानसात संताप; गुन्हा दाखल, पोलीस संशयित आरोपीच्या शोधात

रत्नागिरी प्रतिनिधी

रत्नागिरी शहरानजीकच्या चंपक मैदान परिसरात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरूणीवर सोमवारी सकाळी झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण रत्नागिरी हादरल़ी भर दिवसा घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर येथील जनमानसात तीव्र संतापाची लाट उसळल़ी या घटनेचे वृत्त दुपारी संपूर्ण शहरभर पसरताच जिल्हा शासकीय रूग्णालय येथील परिचारिका संघटनेने कामबंद आंदोलन पुकारल़े विविध राजकीय संघटना, सामाजिक संघटनांनी जिल्हा रूग्णालय धाव घेत संबंधित आरोपीच्या अटकेसाठी आग्रही मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आणि काही वेळ रूग्णालयाबाहेर रास्ता रोको आंदोलनही केल़े.

Advertisement

देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे समोर येत आहेत़ त्याचे लोण आता रत्नागिरीपर्यंत पोहचले आह़े 26 ऑगस्ट रोजी सकाळी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरूणीवर शहरानजीकच्या चंपक मैदान येथे अत्याचाराची घटना घडली आह़े पीडित तरूणीने शहर पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबानुसार शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 64 (1) नुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

रिक्षा उद्यमनगरच्या दिशेने
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरूणी शहरातील एका खासगी रूग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. रविवारी सुट्टी असल्याने ती आपल्या मूळ गावी गेलेली होती. 26 ऑगस्ट रोजी सकाळी एसटीने सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास शहरातील साळवी स्टॉप येथे उतरली. ती साळवी स्टॉप नजीकच्या काही अंतरावर वास्तव्यास असल्याने तिने आपल्या घरी रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. बसमधून उतरल्यानंतर एका रिक्षाला हात दाखवून तिने थांबविल़ी ती तरूणी रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालक रत्नागिरीच्या दिशेने न येता उद्यमनगरच्या दिशेने निघाल़ा त्याबद्दल तरूणीने रिक्षा चालकाला जाब विचारला असता त्याने दुसरा पॅसेंजर घ्यायचा आहे असे सांगितले.

रिक्षाचालकाने पाणी देताच तरूणी बेशुध्द
रिक्षा पुढे निघताच पीडित तरूणीने आपल्याला मळमळत असल्याचे सांगत रिक्षावाल्याकडे पिण्यास पाणी मागितल़े रिक्षाचालकाने दिलेले पाणी तरूणीने प्यालल्यानंतर संबंधित तरूणीला पुढील घटना काहीच आठवत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आह़े. या साऱ्या प्रकारानंतर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पीडित तरूणी शुद्धीवर आल़ी त्यावेळी ती चंपक मैदान परिसरात असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आपल्याकडे पाहिले असता अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते. त्यामुळे ती पुरती भांबावून गेली होत़ी.

स्वत:ला कशीबशी सावरत रस्त्यापर्यंत आली
याच अवस्थेत कशीबशी सावरत मोठ्या धैर्याने ती त्या परिसरातून तेथील मुख्य रस्त्यापर्यंत चालत आली. तिने आपल्या बहिणीला फोन केला व घडलेली घटना कथन केल़ी याचदरम्यान शिरगावहून एक दुचाकी चालक शहराच्या दिशेने येत होता. त्याला त्या पीडितेने थांबविले व आपल्या बहिणीशी मोबाईलवर बोलायला दिले. तिच्या बहिणीने संबंधित दुचाकी चालकाला मजगाव रोड येथील गर्दीच्या ठिकाणी सोडायला सांगितले. त्यानंतर दुचाकीस्वार तरूणाने पीडितेला मजगाव रोड येथील चर्मालय चौकात आणून सोडत तो निघून गेल़ा.

नातेवाईकांकडून 112 वर पोलिसांना दिली खबर
चर्मालय येथे येताच त्या तरूणीने साधलेल्या संपर्कावरून तिच्या वडिलांच्या मित्रांनी तिला ताब्यात घेण्यासाठी तात्काळ धाव घेतल़ी त्याने तिला आपल्या फ्लॅटवर नेल़े तोपर्यंत पीडितेचे नातेवाईकही त्याठिकाणी दाखल झाले होत़े घडल्या प्रकाराबाबत त्यांनी डायल 112 वर फोन करून घटनेची खबर पोलिसांना दिल़ी त्यानंतर लगेचच तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माई&ंनकर, शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी त्या तरूणीची भेट घेरून माहिती घेतली.

परिचारिका संघटनेचे काम बंद आणि निदर्शने
ती तरूणी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यापासून पाच तासांपेक्षा अधिक कालावधी उलटला होत़ा एवढ्या वेळातही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने सुरूवातीला जिल्हा शासकीय रूग्णालय, प्रादेशिक रूग्णालय येथील परिचारिका आक्रमक झाल्या. त्यांनी कामबंद करत जिल्हा रूग्णालयाबाहेर गेटवर एकत्र येत जोरदार निदर्शने सुरू केली. आरोपीला तात्काळ अटक करा अशी त्यांची प्रमुख मागणी होत़ी ‘आम्ही ड्युटी करायची, लोकांचे प्राण वाचवायचे, आमचं संरक्षण करणार कोण? असा जाब सरकारला विचारत त्यांनी सुमारे तासभर घोषणाबाजी करत हे आंदोलन केल़े.

राजकीय नेते, पुढारी, सामाजिक संघटनाही रूग्णालयात
या आंदोलनादरम्यान जिल्हा रूग्णालय विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटना, सर्वसामान्य महिला यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केल़ी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, उदय बने, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, भाजपचे तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष राजन फाळके, नंदू चव्हाण यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होत़े.

रूग्णालय आवारात तणावाचे वातावरण, पोलिसांना घेराव
रूग्णालयाच्या आवारात वातावरण तणावाचे बनले होत़े संतप्त जमावाने पोलिसांना घेराव घालत जोरदार जाब विचारण्यास प्रारंभ केल़ा गुन्हा दाखल करून आरोपीला कधी अटक करणार? असा सवालही केल़ा या तंग वातावरणात पोलीस कुमकही वाढवण्यात आली होत़ी जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत़ा घडल्या घटनेविषयी योग्य माहिती मिळत नसल्याने जिल्हा रूग्णालयाबाहेर येत दोन्ही बाजूच्या रस्त्यावर ठिय्या मारून मार्ग रोखून धरल़ा त्यामुळे शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर तसेच पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल़ा.

रास्ता रोको करणाऱ्यांची पोलिसांनी काढली समजूत
पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुह्याचा तपास सुरू आहे, लवकरच संबंधित गुन्हेगाराला अटक केले जाईल, आम्हाला तपासकाम करायला वेळ द्या असे जमलेल्या नागरिकांना सांगितले. जर आम्ही आम्ही इथेच गुंतून राहिलो तर त्याचा परिणाम तपासावर होईल अशी देखील विनंती केल़ी संतप्त आंदोलकांनी आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांना 24 तासांची मुदत देत रास्ता रोको मागे घेतला. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा रूग्णालयात संतप्त नागरिकांचा जमावा राहिला होता. त्यामुळे येथील सुरक्षेसाठी पोलिसानीं दंगल पथकाला सज्ज ठेवले होते.

रिक्षाचालकांसह इतरांची चौकशी
तरूणीच्या अत्याचाराच्या घटनेनंतर रत्नागिरी शहर परिसरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे पोलिसांनी जिल्हा रूग्णालयासह सर्वत्र बंदोबस्तात वाढ केल़ी याप्रकरणी साळवीस्टॉप येथील रिक्षा चालकांसह इतरांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी साळवीस्टॉप ते उद्यमनगर भागातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही हाती घेतल़ी.

नागरिकांनी संयम राखून पोलिसांना सहकार्य करावे : गायकवाड
पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या तरूणीने सांगितलेल्या वर्णनानुसार त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही स्थितीत आरोपीला तात्काळ अटक केली जाईल. नागरिकांनी संयम पाळून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले आहे.

शहरातील पोलिसांचे सीसीटीव्ही बंद
रत्नागिरी शहरातील घडामोडींवर ‘वॉच‘ ठेवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यावधी निधीचा खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत़ शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारपेठ, किनारी भागात हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. काही ठिकाणी त्यातील कॅमेरे सुरू आहेत तर साळवी स्टॉप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत़ त्यामुळे पोलिसांना खाजगी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची वेळ आली आह़े पोलिसांना आपले बंद सीसीटीव्ही दुरूस्ती करण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध नसल्यामुळे हा दुरूस्तीचा प्रश्न उभा ठाकला आह़े.

परिचारिका संघटना आज काळ्या फिती लावून आंदोलन करणार
आजपर्यंत आम्ही समजत होतो की रत्नागिरी शहर खूपच सुरक्षित आहे. मात्र आजच्या घटनेनंतर हा गैरसमज दूर झाला आहे. परिचारीकांना आपल्या कामादरम्यान अनेकवेळा रात्रपाळी करावी लागते. अनेकवेळा एकट्याने आरोग्यकेंद्रात राहाण्याची वेळ येते. अशावेळी परिचारीकांची सुरक्षितता हा गंभीर विषय आता समोर येरून ठेपला आहे. घडलेल्या दुष्कृत्याच्या विरोधात आम्ही संघटना म्हणून काळ्या फिती लावून निषेध नेंदवणार आहोत. गुन्हेगार तातडीने पकडला जावा आणि त्याला शिक्षा व्हावी यासाठी आजपासून निदर्शने करणार असल्याचे जिल्हा शासकिय परिचारका संघटना अध्यक्ष जॉन मॅथ्यू यानी सांगितले.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना -राजन साळवी
या घटनेला जबाबदार येथील राज्यकर्ते तसेच पोलीस असल्याचा आरोप उबाठाचे आमदार राजन साळवी यांनी केला आह़े सीसीटिव्ही सुरू असते तर संबंधित आरोपीचा सुगावा लागण्यास मदत झाली असत़ी पण ते बंद असल्याने आरोपीचा माग काढण्यात पोलीस प्रशासन निकामी ठरल्याची खंत आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केल़ी ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचे साळवी म्हणाले.

Advertisement
Tags :
Champak fell unconsciousratnagirithe violence the young woman
Next Article