Ratnagiri News : शिळ धरणावरील जॅक वेल कोसळली ; दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार
रत्नागिरी,प्रतिनिधी
Ratnagiri News : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅक वेल कोसळली आहे.सुदैवाने ही जॅक वेल कोसळताना कामगारांनी बाहेर उड्या टाकल्याने ते बचावले आहेत.यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही ऐन पावसाळ्यात रत्नागिरीकरांसमोर पाणी संकट उभे राहिले आहे.
नवीन जॅक वेल चालू करण्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.यावर उपाय म्हणून पानवलं धरणातून व एम.आय.डी.सी कडून पाणी घेऊन त्याचा पुरवठा शहराला केला जाणार आहे.उद्या दुपारपर्यंत शहराला पाणी देण्याचे प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे. सध्या नवीन जॅकवेल बांधून पूर्ण झाला आहे. नवीन जॅकवेल जरी जलद गतीने सुरु करायची म्हटली तरी १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकतो,असे सांगण्यात येत आहे.
सुरु असलेला गणेशोत्सव लक्षात घेता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पहाटे 5 वाजता एमआयडीसी सीईओ बिपीन शर्मा यांना सूचना दिल्या व रत्नागिरी शहराला रोज 10 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे आज दुपारनंतर रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले आहे.