जिल्ह्यात पावसाचे धुमशान! २ दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार कमबॅक
ठिकठिकाणी वाडी- वस्त्या रस्ते पाण्याखाली, किनारपट्टी भागात तांडव
रत्नागिरी प्रतिनिधी
जिल्ह्यात 2 दिवसांया विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळपासूनच आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळू लागला आहे. रत्नागिरी, लांजा, साखरपा, देवरूख, संगमेश्वरसह समुद्री किनारपट्टी भागात धुव्वाधार पावसाने झोडपले असून पुन्हा एकदा अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. समुद्रालाही पांड उधाण आले आहे. काही ठिकाणी गाव- वाड्यांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. 16 जुलैपर्यंत हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्dयाला ‘आरेज अलर्ट' दिला आहे.
जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यानंतर बुधवार, गुरूवारी दोन दिवस पावसा चांगला जोर ओसरल्याने स्थिती होती. गुरूवारी तर कडक ऊन पडले होते. पण शुक्रवार सकाळी 10 वाजल्यापासून मुसळधार पावसाला पारंभ झाला. रत्नागिरी शहर परिसराला या पावसाने दिवसभर झोडपून काढले होते. त्यामुळे शहरातील मांडवी भागात वस्तीमध्ये दोन ते फूट पाणी भरले होते. त्यामुळे मांडवी गावातील अंतर्गत रस्ते बंद झाले होते. समुद्राला जाणारे नाले बुजल्याने पाणी वाहण्यासाठी मार्ग बंद झाले. त्यामुळे सखल भागात पाणी तुंबल्याने तेथील स्थानिकांना त्यातून मार्ग काढले जिकरो बनले होते. मांडवी येथील किनारी भागात असलेल्या काही बंगल्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते.
रत्नागिराया समुद्र किनारी असलेल्या पंधरामाड, जाकिमिऱ्या, अलावा या किनारी भागात समुद्राच्या उधाणाया प्रचंड मोठ्या लाटा धडकत होत्या. त्यामुळे मिऱ्या बंधाऱ्याला तडाखा बसण्यी शक्यता उभी ठाकली आहे. मुसळधार पावसाचा तडाखा ग्रामीण भागालाही बसला. पावसामुळे एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने पवाशी वर्गाला त्या फटका बसला आहे. 16 जुलैपर्यंत हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.