महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

Ratnagiri : परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली, सर्व्हीस रोडलाही तडे

05:19 PM Jun 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

चिपळूण: प्रतिनिधी

Advertisement

गुरुवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी पहाटे 5.30 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात बांधली गेलेली संरक्षक भिंत व सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव कोसळला. सुमारे 200 मीटरचा भाग खचला असून सर्व्हीस रोडलाही तडे गेले आहेत.

Advertisement

कोसळत असलेला पाऊस आणि धोकादायक स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने खालेल्या भागाकडील मार्गिका वाहतुकीसाठी बंद करत पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणा ठाण मांडून बसली आहे. दरम्यान, कोसळलेल्या बांधकामामुळे महामार्ग कंत्राटदार कंपनीच्या बोगस कामांचा पर्दाफाश झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांच्यासह अनेक नागरिकांमधून करण्यात आला.

Advertisement
Next Article