शेअर बाजारात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेला लाखोंचा गंडा
रत्नागिरी शहर पोलिसात तकार दाखल
रत्नागिरी पतिनिधी
शेअर बाजारात पैसे गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे पकार सातत्याने घडत आहेत़ रत्नागिरीत राहणाऱ्या महिलेला गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत 1 लाख 90 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा पकार समोर आला आह़े गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली, हे लक्षात येताच या महिलेने शहर पोलिसात तकार दाखल केल़ी.
पोलिसांनी या पकरणी माया सालम नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 फेबुवारी 2024 रोजी माया सालम नावाच्या महिलेने तकारदार यांच्या मोबाईलवर फोन केल़ा यावेळी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तुम्हांला मोठा नफा मिळवून देवू, असे आमिष माया सालम हिने तकारदार यांना दाखवल़े माया हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करण्यास तकारदार यांनी सहमती दर्शवल़ी त्यानुसार माया हिने तकारदार यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून 1 लाख 90 हजार रुपये संबंधित खात्यावर जमा करण्यास सांगितल़े माया सालम हिने सांगितल्यापमाणे तकारदारांनी 25 फेब्रुवारी ते 2 एपिल 2024 या कालावधीत 1 लाख 90 हजार रुपये पाठवलेल्या लिंकद्वारे ट्रान्स्फर केल़े पैसे ट्रान्स्फर झाल्यानंतर माया सालम हिने पतिसाद देण्यास टाळाटाळ केली, असे पोलीस तकारीत नमूद करण्यात आले आहे. आपले पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात येताच तकारदार यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केल़ी या पकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.