For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ६ लाखांचा गंडा

03:43 PM Jul 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ६ लाखांचा गंडा
Satara Share Marketing fraud
Advertisement

समाजमाध्यमावरील जाहिरातीतून केली फसवणूक; शहर पोलिसात गुन्हा दाखल

रत्नागिरी पतिनिधी

समाजमाध्यमांवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसंबंधी जाहिरात देऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक पकार समोर आला आह़े यापकरणी शहर पोलिसात तकार दाखल करण्यात आली आहे. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आपली 6 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तकारदार यांनी म्हटले आह़े

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तकारदार यांनी समाजमाध्यमावर शेअर मार्केटसंबंधी जाहिरात पाहिली होत़ी यामध्ये अपोलो कंपनीच्या नावाने असलेल्या या जाहिरातीमध्ये शेअर मार्केच्या माहितीसाठी व्हॉटस्ऍप ग्रुप जॉईन करा, असे तकारदारास सांगण्यात आले होत़े त्यानुसार त्यांनी गुपमध्ये सहभाग घेतल़ा यावेळी त्यांना सांची अरोरा नावाच्या महिलेने फोन केल़ा तसेच आपण अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट कंपनीची ऍडव्हायझर असल्याची बतावणी केल़ी संबंधित महिलेने तकारदार यांना कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याचा मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवल़े या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्यांनी 29 फेबुवारी ते 13 मे 2024 या काळात 6 लाख रुपये महिलेने सांगितलेल्या खात्यावर जमा केले. परंतु गुंतवणुकीचा परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तकार दाखल केल़ी पोलिसांनी या पकरणी सांची अरोरा या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.