For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रोन प्रणालीमुळे रत्नागिरीत मासेमारी नौकांची 'हेराफेरी' उघड

05:49 PM Apr 28, 2025 IST | Snehal Patil
ड्रोन प्रणालीमुळे रत्नागिरीत मासेमारी नौकांची  हेराफेरी  उघड
Advertisement

मासेमारी नौकांचे नाव, नोंदणी क्रमांक वापरून दुसऱ्याच नौकेद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरु

Advertisement

रत्नागिरी : अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने ड्रोन प्रणालीद्वारे हवाई गस्त सुरू केली आहे. या ड्रोन प्रणालीमुळे रत्नागिरीत सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब समोर आली आहे. मासेमारीसाठी वापरात नसलेल्या किंवा निष्कासीत झालेल्या मासेमारी नौकांचे नाव, नोंदणी क्रमांक वापरून दुसऱ्याच नौकेद्वारे बेकायदेशीर मासेमारी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित मच्छीमारांनी पोलीस अधीक्षकांसह सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ड्रोन प्रणालीमुळे अनेक अवैध मासेमारी नौका सध्या कारवाईच्या कचाट्यात सापडत आहेत. अशाच प्रकारे ड्रोनने टिपलेल्या नौकांच्या छायाचित्रानुसार रत्नागिरीतील दोन मच्छीमारांना नुकतीच मत्स्य विभागाने सुनावणीस हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यामुळे संबंधित मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली. नादुरुस्त होऊन निष्कासित झालेल्या किंवा समुद्रात लाटांमुळे बुडालेल्या नौकांचे नाव व नोंदणी क्रमांक वापरून भलत्याच नौका अवैधरित्या मासेमारी करत असल्याचा आरोप यावेळी बुडीत नौकाच्या मालकांकडून करण्यात आला. या प्रकारामुळे मत्स्य विभागही अलर्ट झाला आहे.

Advertisement

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार सहाय्यक मत्स्य आयुक्तांनी सुनावणीसाठी घेतलेल्या एका प्रकरणात रत्नागिरीच्या समुद्रात संबंधित नौका प्रतिबंधित क्षेत्रात मासेमारी करत असल्याचे ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रातून समोर आले. याप्रकरणी मत्स्य विभागाकडून संबंधित नौका मालकास सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात आली. सुनावणीवेळी संबंधित मच्छीमाराने वस्तुस्थिती मांडताना सांगितले की, त्यांची नौका वर्षभरापूर्वीच समुद्रात लाटेच्या माऱ्याने वाहून जात बुडून पूर्णत: नष्ट झाली आहे.

बंदरांच्या ठिकाणी होणाऱ्या नौका तपासणीवर प्रश्नचिन्ह ड्रोनच्या हवाई गस्तीमुळे जी बाब समोर एकप्रकारे मत्स्य विभागाकडून बंदरांच्या आली आहे, त्याबाबत खरेतर ड्रोन प्रणाली ठिकाणी जाऊन जी नौका तपासणी केली सुरू होण्याअगोदरपासूनच राज्यातील जाते, त्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. पारंपरिक मच्छीमार आवाज उठवत आहेत. गतवर्षी रत्नागिरीत झालेल्या एका परंतु शासन व मत्स्य विभागाने त्याकडे कार्यशाळेत तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी कायमच दुर्लक्ष केले आहे.

एकच नाव व या बाबत थेट भाष्य केले होते. बेकायदेशीर नंबर असलेल्या किंवा अस्तित्वात नसलेल्या मासेमारी नौकांना बंदरातच रोखण्यासाठी नौकांचे क्रमांक व नाव वापरून त्या नौका त्यांची बंदराच्या ठिकाणीच नीट तपासणी अवैध पर्ससीन किंवा एलईडी मासेमारीसाठी व्हायला हवी. पण मत्स्य विभागाकडून हे वापरात असल्याचा मुद्दा पारंपरिक मच्छीमार काम चोख पार पाडले जात नाही. त्यामुळे गेली पाच-सहा वर्षे सातत्याने उपस्थित समुद्रात सागरी सुरक्षा यंत्रणेचे काम करत आहेत.

आता ड्रोन प्रणालीमुळे ही बाब वाढल्याचे तटरक्षक दलाकडून स्पष्ट करण्यात प्रकर्षाने समोर आली आहे. त्यामुळे आले होते. आपल्या नौकेचे नाव, नंबर वापरून कोणीतरी बेकायदेशीर नौकेने मासेमारी करत असल्याचे त्याने स्पष्ट केले. याबाबत या मच्छीमाराने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मत्स्य विभाग व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. एलईडी मासेमारीसाठी वापर दुसऱ्या प्रकरणात संबंधित नौका प्रतिबंधित सागरी क्षेत्रात एलईडी प्रकाशात मासेमारी करत असल्याचे ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेल्या

छायाचित्रावरून समोर आले. त्यावरून संबधित नौका मालकास नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले या नौकेचे छायाचित्र मच्छीमारास दाखवण्यात आले. त्यावेळी ती नौका आपली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर नौका मालकानेही पोलीस अधीक्षकांसह सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Tags :

.