For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri : राज्यभर वीज कंत्राटी कामगारांनी काळ्या फिती लावून केला निषेध

12:53 PM Jun 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
ratnagiri   राज्यभर वीज कंत्राटी कामगारांनी काळ्या फिती लावून केला निषेध
Ratnagiri Electricity contract workers protested
Advertisement

रत्नागिरी : प्रतिनिधी

वर्षानुवर्षे ऊन वादळ वारा पावसात सतत राबून जनतेला अखंडित वीज सेवा देणाऱ्या कंत्राटी कामागाराकडे शासन व वीज कंपनी प्रशासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राज्यभरात गुरुवार दिनांक 6 जुन रोजी सर्व वीज कंत्राटी कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले.

Advertisement

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा सोबत ऊर्जामंत्री देवेंद्रफडणवीस यांनी मीटिंग घेतल्या मात्र त्यात दिलेल्या आश्वसनाची पूर्तता अधिकारी वर्गाकडून न झाल्याने कामगार वर्गात तीव्र नाराजी होती.

गुरुवारी तिन्ही वीज कंपनीचा 19 वा वर्धापनदिन होता. वारंवार पत्र देऊन सुद्धा प्रशासन जाणीवपूर्वक व सतत कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतूनच कामगारांनी या प्रकारे निषेध नोंदवला. सर्व जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला प्रतिसाद दिला. आता तरी शासन व प्रशासनाने जागे होऊन कंत्राटी कामगारांना उचित न्याय द्यावा कामगारांच्या समस्या सोडवव्यात अशी अपेक्षा सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.