महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इन्स्टाग्राम अकाऊंट ‘हॅक' करून पैशांची मागणी

06:14 PM Sep 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
hacking Social media account
Advertisement

दापोली प्रतिनिधी

सध्या फेसबूक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांचा वापर वाढला असून या माध्यमातून अकाउंट हॅक करून लोकांना मेसेज करून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. काही युवकांनी मित्र-मैत्रीण पैसे मागत आहेत, म्हणून पैसे पाठवल्याचे प्रकारही घडले आहेत. अशा प्रकारामुळे फसलेल्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतल्याने या बाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

Advertisement

तरुणांमध्ये प्रामुख्याने इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅचॅटचा वापर वाढला आहे. यात इन्स्टाग्रामचे वापरकर्ते अधिक आहेत. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून अज्ञात व्यक्तीकडून या खात्याला जोडले गेलेल्या सदस्यांकडे मेसेजद्वारे पैशांची मागणी केली जात आहे. एका तरुणीने आपल्या मैत्रीणीने पैसे मागितले म्हणून चार हजार रुपये पाठवले. त्यानंतर तिने मैत्रीणीशी संपर्क करून पैसे पाठवल्याचे सांगितल्यानंतर मैत्रीणीने कोणताही मेसेज केलेला नसल्याचे समोर आले. त्यानंतर या तरुणीने पोलिसात धाव घेतली. याआधी व्हॉटसऍपवरही आपल्या संबंधित व्यक्तीच्या नंबरवरून मेसेज पाठवले जात होते व पैशांची मागणी केली जात होती. समाजमाध्यमाचा वाढता वापर पाहता हॅकर आता तरुणवर्गाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे समाजमाध्यमे अर्थात इंस्टाग्राम, फेसबुक आदी ऍप वापरकर्त्यांनी जागृत राहण्याची गरज बनली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
Ratnagiri Demanding money hacking Instagram account
Next Article