For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri Breaking : म्हसळा जवळ स्विफ्ट कारला भीषण अपघात; तिघेजण जागीच ठार, १ गंभीर

12:00 PM Jun 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
ratnagiri breaking   म्हसळा जवळ स्विफ्ट कारला भीषण अपघात   तिघेजण जागीच ठार  १ गंभीर
Ratnagiri Breaking
Advertisement

रायगड / प्रतिनिधी

Advertisement

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असलेल्या कणघर या गावाजवळ गोरेगाववरून म्हसळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन 3 ठार तर १ गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी झाला असल्याची माहिती म्हसळा पोलिसांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव ते श्रीवर्धन या मार्गावरील कणघर गावाच्या हद्दीमध्ये रविवारी सायंकाळी हा भीषण अपघात घडला. मारूती स्विफ्ट असलेली कार क्रमांक एम एच ०६-एएन / २२२३ या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे ह्या अपघात घडला असावा अशा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातामध्ये कारचालक मोहम्मद रफीक शेख (३४) रा. म्हसळा, कृष्णा हरिश्चंद्र कांबळे (४५) रा. मेंदडी कोंड, ता. म्हसळा, आणि मोहम्मद याचा मुलगा मुसा शेख (५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद शेख यांचा मोठा मुलगा इसा मोहम्मद शेख (६) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. म्हसळा आणि गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.