For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाळेत गरबा खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू!  वैष्णवी मानेची ‘एक्झिट' मनाला चटका लावणारी    

05:22 PM Oct 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
शाळेत गरबा खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू   वैष्णवी मानेची ‘एक्झिट  मनाला चटका लावणारी    
Advertisement

पाचल वार्ताहर

Advertisement

शाळेत सरस्वती पूजनाच्या निमित्ताने गरबा खेळत असताना चक्कर आल्याने एका १६ वर्षीय तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील पाचल येथे घडली. वैष्णवी पकाश माने ( रा. आजिवली) असे या तरुणीचे नाव असून अत्यंत हुशार आणि मनमिळावू विद्यार्थिनीची अशी दुर्दैवी ‘एक्झिट' सर्वांना चटका लावणारी ठरली आहे.

आजिवली धनगरवाडी येथील वैष्णवी पकाश माने ही पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील सायन्समधून इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. नवरात्र उत्सवानिमित्त शाळेत सरस्वती पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पूजनावेळी शाळेतील विद्यार्थी गरबा नृत्य करत होते. यावेळी वैष्णवीचाही सहभाग होता. गरबा खेळत असताना वैष्णवी हिला अचानक चक्कर आली आणि ती खाली बसली. त्यानंतर वैष्णवी हिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तत्पूर्वी तिची पाणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे पाचलसह आजिवली परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement

अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या वैष्णवीने आजिवली हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत ८६ टक्के गुण मिळवून पथम क्रमांक पटकावला होता. दहावीनंतर इंजिनिअरिंग करण्याचे तिचे स्वप्न होते. यासाठी तिला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशनही मिळालं होतं. मात्र आई-वडिलांची आठवण येत असल्याने तिने ऍडमिशन मिळालेले हायस्कूल सोडून पुन्हा पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हायस्कूलप्रमाणे या महाविद्यालयातही वैष्णवी अभ्यासातील गुणवत्ता, उत्तम वक्तृत्व शैली, खेळातील आवड यामुळे शाळेतील शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होती. नुकत्याच ओणी हायकूलमध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी हिने भाग घेत पथम क्रमांक पटकावला होता.

Advertisement
Tags :

.