For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साखरपा येथे बिबट्याचा पुन्हा हल्ला, तरुण जखमी

05:30 PM Jun 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
साखरपा येथे बिबट्याचा पुन्हा हल्ला  तरुण जखमी
Advertisement

देवरुख प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गुरववाडी येथील बिबटय़ा हल्ला प्रकरण ताजे असताना गावातील जाधववाडी येथे घरामध्ये दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने तरुणावर हल्ला चढवल्याची घटना घडली आहे. अमित जाधव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत. चार दिवसातील या दुसऱ्या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने सदर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.