महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किल्ले गोविंदगडावर सापडले 80 तोफगोळे!

06:40 PM Jul 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
Govindgad fort
Advertisement

चिपळूण प्रतिनिधी

Advertisement

शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या तरूणांना सुरूवातीला दोन तोफगोळे दिसून आल्यानंतर या तरूणांनी राजे सामाजिक प्रतिष्ठानो अध्यक्ष विशाल राऊत यांना कळवले. त्यांनी तत्काळ गडावर जाऊन या युवकांया मदतीने तेथील माती बाजूला करताना एक-एक करत तब्बल 80 तोफगोळे बाहेर काढण्यात आले. गडावर मोठ्या प्रमाणात तोफगोळे सापडण्याची ही पहिला घटना असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर फिरण्यासाठी आलेले शुभम हरवडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवडे, दिगंबर बांद्रे हे गडावरती फेरफटका मारत असताना त्यांना सुरूवातीला तोफेचे 2 गोळे दिसले. त्यानंतर त्या परिसरात शोधमोहीम राबवली असता असंख्य तोफगोळे आढळून आले.

Advertisement
Tags :
#ratnagirGovindgad fortkolhapur newst Govindgad fort
Next Article