महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हर हर महादेवाच्या गजरात बडेकोळळमठ येथे रथोत्सव मिरवणूक

10:50 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

पारंपरिक वाद्यांचा गजर व हर हर महादेवाच्या जयघोषात तारिहाळ येथील पावन क्षेत्र बडेकोळळ मठात रथोत्सव मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. हा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाला बेळगाव, कोल्हापूर, खानापूर व गोवा येथील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गेल्या महिन्याभरात श्रावण मासानिमित्त मठात अभिषेक व इतर अध्यात्मिक कार्यक्रम रोज करण्यात येत होते. भाविक काही मोठ्या प्रमाणात मठात येऊन दर्शनाचा लाभ घेत असत. रथोत्सव मिरवणुकीनिमित्त प्रारंभी मठाचे मठाधीश नागेंद्र स्वामी यांच्या शुभहस्ते मठातील शिवपिंडीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याच शुभ हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत मठाधीश नागेंद्र स्वामी यांना भाविकांनी पुष्पहार व डोक्यावरती किरीट अर्पण करून त्यांना रथावरती विराजमान केले.

Advertisement

खास रथाचे नियोजन

या मिरवणुकीसाठी मठामध्ये खास रथ गेल्या अनेक वर्षापासून बनवून ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर पारंपरिक वाद्य आणि हर हर महादेवाचा जयघोष करत भाविकांनी रथ ओढण्यास सुऊवात केली. मठाच्या परिसरात रथोत्सव मिरवणूक अमाप उत्साहात पार पडली. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी विविध गावातील भजनी मंडळांनी भजन सादर केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article