महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भर पावसात हुदली येथील लक्ष्मी यात्रेचा रथोत्सव उत्साहात

10:47 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भंडाऱ्याच्या उधळणीत देवी गदगेवर विराजमान : भाविकांची लक्षणीय गर्दी

Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

Advertisement

बेळगाव तालुक्यातील हुदली गावची ग्रामदेवता लक्ष्मीयात्रेच्या शुक्रवारी चौथ्या दिवशीही हजारो भाविकांच्या उपस्थितीत महालक्ष्मी देवीचा रथोत्सव मोठ्या भक्तीभावाने पार पडला. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयापासून रथोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी भाविक उद गे आई च्या जयघोषात भाविक भंडाऱ्याची उधळण करत सकाळी 11 वाजता रथोत्सवाला सुरुवात झाली. नंतर मूर्तीची रथातून मोठ्या उत्साहात मिरवणुकीने सायंकाळाच्या सुमारास कन्नड शाळेच्या आवारात घालण्यात आलेल्या मंडपातील गदगेवर प्रतिष्ठापना करण्यात आली. 22 मे पर्यंत देवीची विविध धार्मिक, मनोरंजन कार्यक्रम पार पडणार आहेत. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रीघ लावली होती. ग्रामस्थांच्या घरात आलेल्या पै पाहुणे, आबालवृद्ध यामुळे संपूर्ण गाव गजबजून गेले आहे. खुल्या मैदानावर सुमारे दीडशेहून अधिक विविध मनोरंजनाचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुलांच्या खेळणीचे स्टॉल्स, इलेक्ट्रिक पाळणे, दुकाने, पूजा साहित्य व खाद्यपदार्थाचे स्टॉल्स यांचा समावेश आहे. सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत गर्दी होत आहे. शनिवार व रविवारी सुटी असल्याने बेळगाव परिसरातील भाविकांची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article