महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरात ते अयोध्या पुन्हा रथयात्रा

06:42 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

Advertisement

1990 च्या दशकातील रथयात्रेप्रमाणेच आणखी एक रथयात्रा गुजरातमधून 8 जानेवारी रोजी रामनगरी अयोध्येसाठी निघणार आहे. ही रथयात्रा गुजरात-मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशच्या 14 शहरांमधून जात 1400 किलोमीटरचे मार्गक्रमण करणार आहे. 20 जानेवारी ही रथयात्रा रामनगरी अयोध्येत दाखल होणार आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यावर सर्वसामान्य लोकांना 23 जानेवारीपासून रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. 24 जानेवरीपासून 48 दिवसांपर्यंत विशेष मंडल पूजा होणार आहे.

Advertisement

अहमदाबाद येथील रामचरित मानस ट्रस्ट-न्यूराणिप रथयात्रेचे आयोजन करणार आहे. अयोध्येत पोहोचल्यावर रामलल्लाकरता 51 लाख रुपयांची देणगी देण्यात येईल. यापूर्वी 1990 च्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांनी प्रथम पूज्य सोमनाथ ज्योर्तिलिंग धामपासून अयोध्येसाठी रथयात्रा काढली होती. रथयात्रेनंतरच राम जन्मभूमीचे आंदोलन तीव्र झाले होते.

22 जानेवारी रोजी अभिषेक सोहळ्याची तयारी सध्या जोरदार सुरू असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील होणार आहेत अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे.  तर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौढा यांना भेटण्यासाठी आणि त्यांना सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी तीन सदस्यीय टीम तयार करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी सुमारे 4 हजार संत आणि 2200 अन्य अतिथींना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच 6 दर्शनांचे (प्राचीन विद्यालये) शंकराचार्य आणि सुमारे 150 साधू-संत देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भाग घेणार आहेत.

मंदिराच्या छताचे काम 90 टक्के पूर्ण

रामलल्लाच्या मंदिरात छताचे काम देखील जवळपास 90 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. यानंतर आता भूतलाच्या स्तंभांवर देव विग्रहांना कोरण्यासह फरशीचे निर्मितीकार्य सुरू आहे. निर्माणाधीन मंदिरात फायनल टच दिला जात असल्याचे राय यांनी सांगितले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मंदिराशी निगडित बहुतांश कामे पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुरली मनोहर जोशी-अडवाणींना आमंत्रण

राम मंदिर उभारणीसाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांना अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांसोबत राम मंदिर आंदोलनासंबंधी चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी दिली आहे.

5000 हिऱ्यांनी राम मंदिर नेकलेसची निर्मिती

सूरतचे हिरे व्यापारी कौशिक काकाडिया यांनी राम मंदिराच्या थीमवर एक नेकलेस तयार केला आहे. या नेकलेसमध्ये 5 हजारांहून अधिक अमेरिकन हिरे आणि 2 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. हा हार अयोध्येतील राम मंदिराला देण्यात येणार आहे. अयोध्येच्या नवया राम मंदिराने प्रेरित होत हा हार तयार केला आहे. याची निर्मिती आम्ही विक्रीच्या उद्देशाने केलेली नाही. हा हार आम्ही राम मंदिराला देऊ इच्छितो. रामायणातील मुख्य व्यक्तिरेखांना या नेकलेसच्या स्ट्रिंगमध्ये कोरण्यात आले असल्याची माहिती काकाडिया यांनी दिली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article