उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन
वरळीच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : पोलिसांची टाटा यांना मानवंदना
मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी बुधवारी रात्री निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी ऊग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटा यांच्या पार्थिवावर गुऊवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आधी मुंबई पोलिसांनी टाटांना मानवंदना दिली. टाटा हे पारशी समाजाचे असल्या कारणाने त्यांच्यावर नेमक्या कुठल्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार याची चर्चा होत असताना त्यांच्या पार्थिवावर येथील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान टाटा यांचे पार्थिव एनसीपीए येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी मुंबईतील सर्व समाजाने त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी पूर्ण वेळ त्यांचा लाडका श्वान गोवा हा देखील होता.
टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी ऊग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर गुऊवारी सकाळी ते दुपारी 4 या वेळेत लोकांना त्यांचे अंतिमदर्शन घेता यावे याकरिता त्यांचे पार्थिव मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पेंद्रीय गफहमंत्री अमित शहा, पेंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रतन टाटा यांच्या नावे उद्योगरत्न पुरस्कार
दरम्यान आजच्या कॅबिनेट मंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी, राज्यातील उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच नरिमन पॉईंट येथे उभारण्यात येणाऱ्या उद्योग भवनाच्या वास्तूला रतन टाटा यांचे नाव देणार असल्याचे सामंत यांनी जाहीर केले.
दुर्मिळ रत्न हरपले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा यांच्यावर निधनानंतर भावना व्यक्त करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘दुर्मिळ रत्न हरपले... नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
मोठ्या मनाचे व्यक्ती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रतन टाटा हे केवळ यशस्वी उद्योगपतीच नव्हते कर अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता. रतन टाटा यांनी देशामध्ये उद्योग तर सुरु केलेच पण त्याचबरोबर एक मोठी विश्वासहर्ता उभी केली आणि टाटा हा ब्रॅन्ड ग्लोबल केला. जगाचा पाठीवर विश्वास मिळवला. पण त्याचवेळी आपली सगळी संपत्ती ही टाटा ट्रस्टच्या माध्यमांतून विश्वस्त व्यवस्थेमध्ये त्यांनी ठेवली. या टाटा र्ट्स्टने समाजोपयोगी काम केले आहे, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये केलेले कामही आदर्शनीय आहेत. रतन टाटा हे असे व्यक्ती आहेत जे स्वत?पेक्षा समाजासाठी आणि देशासाठी जास्त जगले आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणे हे देशाचे फार मोठ नुकसान आहे. त्यांची जागा कोणीची भरु शकत नाही.