महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘द गर्लफ्रेंड’मध्ये रश्मिका मंदाना

06:44 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूर्ण देशात ‘श्रीवल्ली’ म्हणून प्रसिद्ध झालेली रश्मिका मंदाना ही दक्षिणेसोबत उत्तर भारतातही अत्यंत लोकप्रिय आहे. रश्मिका एकीकडे स्वत:चा बॉलिवूडपट ‘अॅनिमल’च्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे तिने स्वत:चा नवा चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’ची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement

अॅनिमल या चित्रपटात रश्मिका ही रणवीर कपूरसोबत झळकणार आहे. तर द गर्लफ्रेंड या चित्रपटात ती एका रोमांचक प्रेमकहाणीत मुख्य भूमिका साकारणर आहे. हा तिच्या कारकीर्दीतील 24 वा चित्रपट ठरणार आहे. द गर्लफ्रेंड या चित्रपटात तिचीच मध्यवर्ती भूमिका असणार आहे. राहुल रवींद्रन याचे दिग्दर्शन करणार असून अल्लू अरविंद यांच्या गीता आर्ट्सकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

Advertisement

जग महान प्रेमकहाण्यांनी व्यापून गेले आहे. परंतु काही प्रेमकहाण्या या पूर्वी कधीच ऐकल्या गेल्या नाहीत, द गर्लफ्रेंड अशाच प्रेमकहाण्यांपैकी एक असल्याचे रश्मिकाने स्वत:च्या नव्या चित्रपटाची घोषणा करताना म्हटले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक अत्यंत रोमांचक वाटत आहे. रश्मिका आगामी काळात अॅनिमल, रेनबो, डी51, छावा, पुष्पा : द रुल आणि रवि तेजासोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article