For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भविष्य

06:15 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
भविष्य
Advertisement

दि. 27.10.2024 ते 2.11.2024 पर्यंत

Advertisement

मेष

एखादे प्रलंबित काम  पूर्ण होऊ शकते. आध्यात्मिक कार्याकडे कल राहील. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळण्याची शक्मयता आहे. लोक तुमच्या प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा करतील-जास्त जबाबदारी घेतल्याने तुम्हाला थकवा येईल. कोणाशीही अनावश्यक वाद घालणे टाळा. तसेच कुठेही पैसे खर्च करण्यापूर्वी तुमचे बजेट लक्षात ठेवा.

Advertisement

डाळींब दान करा

वृषभ

परिस्थितीला न घाबरता आपल्या इच्छेनुसार निर्णय घेण्याची गरज आहे.  लोकांच्या टीकेमुळे वेदना होऊ शकतात. सध्या कोणताही वाद निर्माण करू नका. इतरांना तुमचा निर्णय समजण्यास थोडा वेळ लागेल. पैशाची आवक चांगली होईल आणि समस्या सुटतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन सौदे होतील आणि नोकरीमध्ये प्रवासाची शक्मयता आहे.

 श्रीगणेशाला लाल फुले अर्पण करा.

मिथुन

अनपेक्षित लाभ होऊ शकतात. सकाळी तुम्हाला लाभदायक बातमी मिळेल. जमीन आणि मालमत्तेतून लाभ होईल आणि वादात विजय मिळेल. शत्रूंवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. बांधकाम साहित्य, शेती उपकरणे आणि इतर उपकरणे व्यावसायिकांना फायदा होईल.

हनुमानजांसाठी तेलाचा दिवा लावा. मंदिरात सेवा करा

कर्क

तुमची कोणतीही योजना राबवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमचे मनोबलही उंचावेल. तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक कामातही लक्ष दिल्याने नात्यात गोडवा वाढेल. शेजाऱ्यांशी सुरू असलेली कोणतीही समस्या नकारात्मकतेने सोडवली जाईल.  यावेळी शक्मय तितके खर्चावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात अचानक व्यत्यय येऊ शकतो.

साखर खाऊन कामाला जावे

सिंह

कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण रूपरेषा तयार करा.  वैवाहिक जीवनात किंवा बिझनेस पार्टनरमध्ये परस्परसंबंधात काही तक्रारी असतील. व्यवसायाशी संबंधित कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. यावेळी  कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडेही लक्ष द्या. कामासाठी प्रवास शक्मय आहे. कुटुंबासोबत योग्य वेळ जाईल.

सूर्याचे दर्शन घेऊन बाहेर पडा

कन्या

आपल्या व्यवसाय प्रणाली आणि कार्य प्रणालीमध्ये केलेले बदल योग्य परिणाम देतील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल. तणावामुळे तुमच्या पचन आणि कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतो. सकारात्मक राहा. आध्यात्मिक कार्यातही थोडा वेळ घालवा. अपेक्षेप्रमाणे लाभ मिळाल्यास आनंद होईल. मोठे निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास राहील. तब्येतीला सांभाळा.

 गायीला चारा घाला

तूळ

आतापर्यंत तुम्ही अनेक गोष्टींना सामोरे जाण्यास तयार नव्हता, परंतु विचारांमध्ये बदल करून, कठीण गोष्टींकडे लक्ष दिल्यास जीवनात स्थिरता येऊ शकते.  कामाशी संबंधित प्रशिक्षण महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला मोठी संधी मिळू शकते.  कुटुंब आणि जोडीदाराशी चांगले संबंध ठेवण्याकडे लक्ष द्यावे लागेल.  अॅसिडिटीची समस्या वाढण्याची शक्मयता आहे.

केसराचा टिळा लावा

वृश्चिक

तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसराच घेऊ शकतो. काम आणि कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमच्याकडून कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढताना दिसत आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला समजून घ्या, तरच त्यांच्या समस्या सोडवणे शक्मय होईल. एकमेकांचा गैरसमज करून घेऊ नका. आरोग्याकडे नीट लक्ष देण्याची गरज आहे.

नागकेशराचे दाणे जवळ ठेवा

धनू

जीवनात संतुलन राखणे गरजेचे ठरेल. अनेक प्रसंगी स्वत:च्या इच्छा दुय्यम करून इतरांना किम्मत द्यावी लागेल. तब्येत नरम गरम राहील. सोबत काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर अकारण वाद होऊ शकतो. घरातील वातावरण सुधारण्याचे प्रयत्न करा. गाडी चालवताना डाव्या पायाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक चढ उतार पहायला मिळतील.

 दूध पिऊन कामाला जावे

मकर

अज्ञाताची भीती राहील. म्हणजे नको त्या गोष्टींचा अति विचार केल्यामुळे त्रास होईल. कामाच्या ठिकाणी तणाव राहील. खर्च जास्त होईल, सांभाळा.  वाद निर्माण होतील. गुऊवारपासून तुम्हाला थोडा आराम वाटेल आणि संध्याकाळी पैसे मिळू शकतात. प्रवास सुखकर होईल, काम जलद होईल. एखाद्या स्त्रीकडून फायदा होऊ शकतो.

दुर्गादेवीला तुपाचा दिवा अर्पण करा.

कुंभ

तब्येतीकडे वेळेवर लक्ष द्या नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. कामे वेळेवर होतील आणि आवकही चांगली होईल, पण मन उदासीन राहील. धार्मिक कार्यात ऊची राहील. प्रवासात अडचण येऊ शकते. खर्चही जास्त होईल.  शुक्रवार संध्याकाळपासून वेळ अनुकूल राहील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. महिलांना हा आठवडा चांगला असेल.

पगोड्यात तुपाचा दिवा लावा.

मीन

आठवड्याच्या  सुऊवातीला अडथळे येऊ शकतात, तुम्हाला चांगल्या वेळेची वाट पहावी लागेल. तुम्हाला कर्ज घेण्याची गरज जाणवेल. पण पुढचा विचार करूनच निर्णय घ्या. कमाई आवश्यकतेपेक्षा कमी असेल आणि घरच्या लोकांडून योग्य ते समर्थन उपलब्ध होणार नाही. गरजेच्या वेळेला मित्र मागे हटतील. कोणालाही आश्वासन देऊ नका.

गरिबांना केळीचे फळ दान करा.

जास्त खोडकर मुलाला दुरुस्त करण्यासाठी शनिवारी रात्री जेव्हा मूल गाढ झोपेत असेल तेव्हा त्याचे  तीन-चार केस कापून  पांढऱ्या कागदात गुंडाळून त्याची राख दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी एका चौकात टाका. घरी आल्यावर आंघोळ करून एका चमच्यात खसखस, दोन चमचे देशी तुपात तळून दुधात मिसळा आणि मुलाला द्या. असे आठवडाभर केल्यास फायदा होईल.

Advertisement
Tags :

.