महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशी भविष्य

06:08 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष

Advertisement

घरातील वातावरण बिघडण्याची शक्मयता आहे. सासरच्या माणसांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. आपले विचार आपल्या मुलांवर थोपवू नका.  आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरा. काही नवीन लोकांना भेटल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. प्रवासाची दाट शक्मयता आहे. वैवाहिक  मधुरता येईल. अन्नदान करा

Advertisement

वृषभ

कामाच्या नवीन संधी मिळतील. विवाहित जीवन आनंदात जाईल आणि करमणुकीच्या उद्देशाने तुम्ही छोटासा प्रवास करू शकता. मुलाकडून तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही वेळ चांगला आहे, अनुकूल निकाल मिळतील. नोकरी व्यवसायातही प्रलंबित कामात प्रगती होण्याची शक्मयता आहे. लोकांची वाहने, घरे वगैरे खरेदी करण्याच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

शनिवारी मोहरीचे तेल दान करावे

मिथुन

हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहील. ऑफिसमधील आपल्या निष्काळजी वृत्तीमुळे तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागू शकते. एक कार्य पूर्ण केल्यावर, दुसरे कार्य प्रारंभ करा. विवाहित जीवनात तणावाचे वातावरण असेल. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. भागीदारांसह व्यवसायात थोडा त्रास होईल. विद्यार्थी वर्गासाठी वेळ मध्यम आहे.

गणपतीला लाडू आणि दुर्वा अर्पण करा.

कर्क

नवीन काम सुरू करण्यासाठी हा आठवडा अनुकूल नाही परंतु जुन्या प्रकल्पांचा विकास होईल आणि लाभही होईल. आपण अडकलेले पैसे मिळवू शकता, निश्चितपणे प्रयत्न करा. जोडीदाराची तब्येत अडथळा ठरेल. विरोधक गप्प बसतील. आपला विनोदी स्वभाव आपली लोकप्रियता वाढवेल. घरात धार्मिक उत्सव होण्याची शक्मयता आहे, शुभ कार्याचे योग असतील.

चांगल्या मित्रांसह चांगला वेळ घालवाल.

सिंह

हा आठवडा आव्हाने व अडथळ्यांचा असू शकतो. कोणाशीही अनावश्यक बोलून वाद वाढवू नका. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी मध्यम असेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद नसल्यामुळे काही तणाव राहतील. प्रेमसंबंधात बदल होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. जमीन, मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकते.

गरजू मुलांच्या शिक्षणास मदत करा.

कन्या 

कार्यात आत्मविश्वास दिसेल व तुम्हाला लाभ मिळेल. एकत्रित केलेल्या, सहकार्याच्या कार्यात फायदा होईल. कौटुंबिक आनंदात भरभराट होईल. आर्थिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल असेल. विद्यार्थी वर्गाचे लक्ष अभ्यासात लागेल. प्रेम संबंधात जवळीक वाढेल, नवीन प्रेमसंबंधही निर्माण होऊ शकतात. वडिलांचा किंवा सहकारी वर्गाचा आधार तुमच्या जीवनात बदल निर्माण करेल.

दूध दान द्या

तूळ

तुम्ही उत्साहाने महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल पण तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आर्थिक दृष्टीकोनातून सामान्य वेळ असेल. परिश्र्रम करूनच तुम्हाला पैसे मिळतील. मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या, त्वचारोगसंबंधी आजार होण्याची शक्मयता आहे काळजी घ्या.

देवीला अत्तर द्या.

वृश्चिक

हा आठवडा आपल्यासाठी खूप फलदायी आहे. व्यवसाय आणि भागीदारीतून नफ्याचे संकेत आहेत आणि यामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी गती मिळेल.  कुटुंबात सुख समृद्धी असेल. घर बदलणे किंवा जमीन व मालमत्ता खरेदी करणे शुभ ठरेल. आपण घेतलेले सर्व निर्णय फायदेशीर ठरतील. जोडीदाराच्या पूर्ण सहकार्याने विवाहित जीवन चांगले राहील.

 शनिवारी सात प्रकारचे धान्य दान केल्यास फायदा होईल.

धनू

हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे, तुमचे आरोग्य उत्तम राहील.  धार्मिक ठिकाणी  जाण्याची शक्मयताही आहे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल. मित्र व नातेवाईकांकडून इच्छित सहकार्य मिळेल. घरात इष्ट मित्र आणि नातेवाईकांचे येणेजाणे वाढेल.  शत्रूची बाजू कमकुवत होईल. व्यवसायाच्या प्रगतीत इच्छित कामांची पूर्तता होईल.

विष्णू सहस्रनामांचा जप करावा.

मकर 

सुऊवात आपल्यासाठी आनंददायक असेल परंतु आपला स्वभाव रागीट होऊ शकतो. अपेक्षेनुसार काम केले नाही तर मन दु:खी होईल. आपली चिडचिड होऊ शकते. आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ मिश्रित आहे, धोकादायक पैशाची गुंतवणूक टाळा अन्यथा आपणास नुकसान सहन करावे लागू शकते.

माशांना आहार देऊन आर्थिक प्रगती होईल.

कुंभ

हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे, विशेषत: आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंधदेखील सौहार्दपूर्ण असतील, आपण नवीन कपडे, दागदागिने इत्यादींची खरेदी कराल. नवरा-बायकोमध्ये मतभेद असतील.  धर्म आणि अध्यात्माकडे कल वाढेल. नोकरी करणाऱ्यांनी यावेळी थोडा संयम साधण्याची गरज आहे.

दिव्यांगांना जेवण द्या.

मीन

या महिन्यात तुमची आर्थिक संसाधने वाढतील. सामाजिक आणि व्यावहारिक परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहणार नाही. शत्रू आपले नुकसान करू शकणार नाही. वाहन चालवताना काळजी घ्या. अनैतिक कृत्य करणाऱ्या मित्रांपासून लांब राहा. भागीदारी व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यासाठी घाई करू नका किंवा धोकादायक कार्य टाळा.

कुत्र्याला जेऊ घाला.

 

 टॅरो उपाय: 

आज-काल विवाह जमणे  हे महाकठीण काम होऊन बसले आहे.   याला अवास्तव अपेक्षा  हेही कारण आहे पण त्यामुळे पालकांना  खूप टेन्शन येते.  लवकर लग्नासाठी मुलाने किंवा मुलीने सोमवारी 1200 ग्रॅम हरभरा डाळ आणि 1.25 लिटर कच्चे दूध दान करा. लग्न होईपर्यंत हा प्रयोग चालू ठेवावा लागतो. लग्नाच्या चर्चेसाठी घरी आलेल्या पाहुण्यांना अशा प्रकारे बसवावे की त्यांचे चेहरे घराच्या आत असतील आणि त्यांना दरवाजा दिसणार नाही

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article