राशिभविष्य
दि. 1-9-2024 ते 7-9-2024 पर्यंत
मेष
तुमच्या धडाडीच्या स्वभावाला थोडा आवर घालण्याची गरज आहे. विचारपूर्वक निर्णय घेतले तर कामे पूर्ण होतील. घरातील एखाद्या सदस्याचे मन वळवावे लागेल. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे फळ मिळेल. जोडीदाराशी वाद संभवतात. एखादा माणूस धोकेबाज असू शकतो. त्यामुळे सावध रहावे. तब्येतीच्या किरकोळ तक्रारीसाठी वेळीच इलाज करावा.
पांढऱ्या रंगाचे फूल धार्मिक स्थळी घेऊन जावे.
वृषभ
मनासारख्या घटना घडण्यासाठी प्रयत्नांचीही तितकीच आवश्यकता असते हे तुम्हाला जाणवेल. या आठवड्यात जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो आणि त्यामुळे रिलेशन बिघडू शकते. यासाठी बोलण्यात गोडवा ठेवावा. कामाच्या ठिकाणी पैशांच्या बाबतीत काळजी करण्यासारखे काही नसेल. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना सावध राहण्याची गरज आहे.
निळ्या रंगाच्या फुलांना सांडपाण्यात सोडावे.
मिथुन
या आठवड्यात बऱ्याच गोष्टींमध्ये बिझी असाल. हा आठवडा साधारण संमिश्र फळ देणारा असेल. काही घटना तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे फळ देतील तर काही घटनांमध्ये अपेक्षाभंग होईल. पुढे येणारे यश तुमचेच आहे हेही लक्षात ठेवून कामे करा. स्पर्धा परीक्षांमध्ये जर नैराश्य आले असेल तर पुढच्या वेळी यश मिळेल. घरातील सदस्यांमध्ये वादावादीचे प्रसंग येऊ देऊ नका.
जांभळ्या रंगाच्या कागदात पिवळे फूल ठेवून खिशात ठेवावे.
कर्क
आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जुनी दुखणी जर असतील तर त्यांचा त्रास होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला मनात नसताना मदत करावी लागेल. तुमच्या मागे बरेच जण बोलणारे आहेत हे ध्यानात ठेवून आपले सिक्रेट्स कोणालाही सांगू नका. कामात थोडी मंदी येईल. पण काही दिवसातच तुमच्या मनाप्रमाणे कामे मिळतील. मैत्रीमध्ये विश्वासघात होण्याचे योग आहेत.
लाजाळूची पाने जवळ ठेवावीत.
सिंह
कामाच्या ठिकाणी कर्तृत्वाला वाव मिळेल. पण त्याचबरोबर एखादी व्यक्ती तुमच्यावर आणि तुमच्या कामावर जळते. एखादे षड्यंत्र करू शकते. त्यामुळे सावध राहावे. लहान मोठा अपघात, ठेच लागणे, किंवा पाठीचे दुखणे त्रास देऊ शकते. वैवाहिक जोडीदाराशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करावा. नोकरी किंवा धंद्यामध्ये आपल्या कामापुरते राहिल्यास संभाव्य धोका टळेल.
तेल दान द्यावे.
कन्या
थोडासा गूढ असा स्वभाव असल्याने तुमच्या बाबतीत इतरांचे मत हे काहीसे कन्फ्युज्ड असते आणि यामुळे गैरसमज पसरतात. या आठवड्यात आपल्या वागणुकीने किंवा बोलण्याने कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. पैशांची आवक ठीकठाक असेल. कौटुंबिक आनंदात कमी पडणार नाही. पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल.
गाईला चारा घालावा.
तुळ
जे पेराल ते उगवेल आणि जे द्याल तेच परत येईल हा सृष्टीचा नियम आहे हे लक्षात घ्या. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माची फळे तुम्हाला मिळतील. पण याच बरोबर एक इशारा असा देण्यात येतोय की, तुमच्यामुळे मन दुखावलेली व्यक्ती सूड घेण्याचा प्रयत्न करू शकते. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. आर्थिक लाभ थोडा कमी होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. जोडीदाराशी रुसवा फुगवा होऊ शकतो.
केशराचा टिळा लावावा.
वृश्चिक
पैशांच्या बाबतीत कभी खुशी कभी गम अनुभवाला येईल. काही दिवस कामांची रीघ लागेल तर काही दिवस कामे नसल्याने कंटाळा येईल. तुमच्या जवळच्या व्यक्तीला महत्त्वाची बातमी समजू शकते. जिचा फायदा तुम्ही उठवाल. कौटुंबिक जबाबदारी आणि कौटुंबिक कामे वाढतील. तुम्ही पथ्य-पाणी नीट पाळले तर तब्येतीच्या तक्रारी कमी होऊ शकतात. नवीन जबाबदारी मिळेल.
जोडीदाराला परफ्युम भेट द्यावे.
धनु
आठवड्यातील दिवसांचे प्लॅनिंग आणि कामाचे नियोजन या दोन गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर हा आठवडा चांगला लाभ देऊ शकतो. सगळी कामे स्वत:च्या अंगावर न घेता इतरांना वाटली तर कामे लवकर होतील आणि यशस्वी देखील होतील. तब्येत सांभाळावी लागेल. व्हायरल इन्फेक्शन्स त्रास देऊ शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल. पैशांची आवक चांगली असेल.
पिवळ्या रंगाची मिठाई धार्मिक स्थळी दान द्यावी.
मकर
हा आठवडा कित्येक दृष्टीने चांगला जाण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. कौटुंबिक बाबतीमध्ये प्रगतीचा सल्ला घ्यावा लागेल. दिलेल्या वचनाला पाळले तर समोरची व्यक्ती अधिक फायदा देऊ शकते हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी एखाद्या स्त्राrमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या योजना केवळ तुमच्यापर्यंत ठेवा, इतरांना त्याबद्दल माहिती करू देऊ नका.
कुत्र्याला चपाती खायला घालावी.
कुंभ
करायला जावे एक आणि व्हावे दुसरेच असा काहीसा अनुभव येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आपुलकीने दुसऱ्याला सल्ला द्यायला जाल पण समोरची व्यक्ती जर सल्ला स्वीकारायला तयार नसेल तर त्यावर तुमचा काही उपाय चालत नाही हे लक्षात घ्या. आर्थिक आवक समाधानकारक असेल पण मानसिक त्रास संभवतो.
आंघोळीच्या पाण्यात दोन थेंब दूध घालावे.
मीन
हा काळ सावधान राहण्याची गरज आहे. ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करता ते सगळेच विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे नसतात हे लक्षात घ्या. कामाच्या ठिकाणी घडलेल्या काही घटनांमुळे मन उदास होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या येणारा काळ महत्त्वाचा असेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. तुम्ही केलेल्या अतिरिक्त कामाचे कौतुक होईल. स्वत:करता वेळ काढण्याची गरजसुद्धा आहे.
जलचरांना खाणे घालावे.
टॅरो उपाय : चांगली ठणठणीत असलेली व्यक्ती अचानक विचित्र वागू लागते. मानसिक स्थिती बिघडते. वैद्यकीय उपचार गरजेचे आहेतच. याचबरोबर एक छोटासा प्रयोग करून बघायला हरकत नाही. झाडू आणि मुसळ रोग्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेला उतरून झोपेच्या जागी उशापाशी ठेवावे.