For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशी भविष्य

06:01 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
राशी भविष्य
Advertisement

एका नजरेत 2024 मधील सगळे सनातनी सण-उत्सव

Advertisement

महत्त्वाचे दिवस.

(या कागदाच्या मागे पांढरा कागद चिकटवून जिथे यंत्र आहे त्याच्या मागे  आपले व आपल्या आईचे नाव लिहावे, सगळ्या बाजूने संरक्षण, आर्थिक उन्नती, मानसन्मान या बाबतीत चांगले अनुभव येतील. हा कागद कायम जवळ ठेवावा)

Advertisement

एका नजरेत 2024 मधील सगळे सनातनी सण-उत्सव-महत्त्वाचे दिवस.

एकादशी-7/1, 21/1, 6/2, 20/2, 6/3,20/3, 5/4, 19/4, 4/5, 19/5, 2/6, 18/6, 2/7, 17/7, 31/7, 16/8, 29/8, 14/9, 28/9, 13/10, 28/10, 12/11, 26/11, 11/12, 26/12.

संकष्ट चतुर्थी - 29/1, 28/2, 28/3, 27/4, 26/5, 25/6(अंगारकी), 24/7, 22/8, 21/9, 20/10, 18/11, 18/12.

प्रदोष-9/1, 23/1, 7/2, 21/2, 8/3, 22/3, 6/4, 21/4, 5/5, 20/5, 4/6, 19/6, 3/7, 19/7, 1/8, 17/8, 31/8, 15/9, 30/9, 15/10, 29/10, 13/11, 28/11, 13/12, 28/12.

शिवरात्र-9/1, 8/2, 8/3(महाशिवरात्री), 7/4, 6/5, 4/6, 4/7, 2/8, 1/9, 30/9, 30/10, 29/11, 29/12.

अमावास्या10/1, 9/2, 9/3, 7/4, 7/5, 5/6, 5/7, 3/8, 2/9(पिठोरी), 1/10, 31/10, 30/11, 30/12.

पौर्णिमा24/1, 23/2, 24/3, 23/4, 22/5, 21/6, 20/7, 18/8, 17/9, 16/10(कोजागरी),15/11, 14/12.

साडेतीन मुहूर्तागुढीपाडवा -9/4 सनातन धर्माच्या नव्या वर्षाचा आरंभ,

अक्षयतृतीया10/5, दसरा-12/10, दीपावली पाडवा-2/11.

गुऊपुष्यामृत योग-25/1, 22/2, 26/9, 24/10, 21/11.

 महत्त्वाचे सणमकर संक्रांत-15/1, गणेश जयंती-13/2, रथसप्तमी-16/2, होलिका प्रदीपन-24/3, धुळवड-25/3,  रंगपंचमी-30/3, रामनवमी 17/4, हनुमान जयंती 23/4, नृसिंह जयंती-21/5, बुद्धपौर्णिमा-23/5, शनैश्चर जयंती- 6/6, दशहरा समाप्ती-16/6, वटपौर्णिमा-21/6, कर्नाटक बैंदूर-22/6, आषाढी एकादशी-17/7, गुऊपौर्णिमा-21/7, दीपपूजा-4/8, नागपंचमी -9/8, स्वातंत्र्य दिन-15/8, वरदमहालक्ष्मी व्रत-16/8, रक्षाबंधन नारळी पौर्णिमा-19/8, श्रीकृष्ण जन्माष्टमी-26/8, गणेश चतुर्थी-7/9, गौरी पूजन -11/9, गौरी गणपती विसर्जन-12/9, अनंत चतुर्दशी-17/9, महालय प्रारंभ-18/9, सर्वपित्री अमावास्या-2/10, घटस्थापना-3/10, ललिता पंचमी -7/10, खंडेनवमी, दसरा- 12/10, गोवत्स द्वादशी-28/10, धनत्रयोदशी -29/10, नरकचतुर्दशी-31/10, दीपावली अमावास्या-1/11, भाऊबीज -3/11, कार्तिकी एकादशी-12/11, त्रिपुरी पौर्णिमा-15/11, दत्त जयंती -14/12.

मेष

तब्येतीच्या तक्रारीतून गुऊ तारून नेईल. काळजी कऊ नका. काहीतरी नुकसान होता होता वाचेल. सावध रहा. जिथे मान मिळेल तिथेच जा. अन्यथा, अपमान होण्याची शक्मयता आहे. कोणत्याही घातक गोष्टीपासून शरीराला जपा. नसते धाडस दाखवू नका. सध्या हवा बिघडली आहे. तब्येतीला जपा.

उपाय - तुळशीला प्रदक्षिणा घाला.

वृषभ

व्यापारात फायदा संभवतो. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. पण किंचितसे काही बाबतीत मतभेदही होण्याची शक्मयता आहे. विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्मयता आहे. शक्मयतो वादविवादात पडू नका. वादाने मन:स्ताप होतो. सामंजस्याने व प्रेमाने बऱ्याच गोष्टी सुखकर व सोयीस्कर होतात.

उपाय : केशरी टिळा लावा.

मिथुन

सासरकडून काहीतरी लाभ होण्याची शक्मयता आहे. द्रव्य किंवा संपत्ती मिळविण्यासाठी चुकूनसुद्धा अनैतिक मार्गाचा अवलंब करू नका. नंतर पस्तावायची वेळ येईल असे करू नका. मन चंचल राहील. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासाठी वेळ द्या. त्यांची काळजी घ्या.

उपाय: विष्णूची उपासना करा.

कर्क

सत्संग घडेल. शक्मयतो होईल तितक्मया लोकांना विशेषत: गरीब किंवा अपंग लोकांना मदत करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. घरातील वृद्धांची काळजी घ्या. वडिलांचे सुख मिळेल. त्यांचा आशीर्वाद घ्या. सुसंवाद घडेल. हे दिवस प्रवासाचे आहेत, एखादी छोटी ट्रिप कुटुंबासोबत काढा. वेळ छान, आनंदात जाईल.

उपाय : कुलदेवतेची आराधना करा.

सिंह

उद्योग-व्यापारात धनलाभ होईल. काहीतरी विशेष कार्य आपल्या हातून घडण्याची शक्मयता आहे. आपल्या या कार्याचे विशेष कौतुक होईल. नोकरीत असाल तर मानसन्मान मिळेल. तुमच्या स्वतंत्र व्यवसायातील अगर नोकरीतील केलेल्या कामाने अगर तुम्ही केलेल्या सामाजिक कार्याने समाजात आपला दर्जा उंचावेल.

उपाय : नामस्मरण करा.

कन्या

धनलाभ संभवतो आहे. वडील भावंडांचे सुख मिळेल किंवा त्यांची गाठभेट होईल. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या संगतीत वेळ चांगला जाईल. या भेटीगाठीतून आपल्याला फायदा होईल. स्वतंत्र उद्योगातून अथवा नोकरीतून आपल्याला काहीतरी फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. एकूण हा आठवडा चांगला जाईल.

उपाय : मुक्या-प्राण्यांना खाऊ घाला.

तूळ

कोणतेही काम करताना मग ते सरकारी असो अगर खासगी असो काळजीपूर्वक करा. करायला गेलो एक झाले एक अशी वेळ येऊ देऊ नका. खर्च जपून करा. धनसंचय करण्याचा प्रयत्न करा. कोर्ट कचेरीची कामे सांभाळून करा. खर्च संभवतो. गाडी चालवताना जपून व सांभाळून चालवा.

उपाय: गणपतीवरील निर्माल्यातील दुर्वा जवळ बाळगा.

वृश्चिक

जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. स्वतंत्र व्यवसायात असाल तर प्राप्ती चांगली होईल. विवाह जुळण्यासाठी प्रयत्नात असाल तर जोडीदार चांगला मिळेल. आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्न तर सर्व काही सुंदर व प्रसन्न. काहीतरी करून दाखविण्याची इच्छा, महत्त्वाकांक्षा बळावण्याची शक्यता आहे.

उपाय:माऊतीची उपासना करा.

धनु

या आठवड्यात कुटुंबाबरोबर वेळ घालवाल. बऱ्याच काळानंतर एखाद्या वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्मयता आहे. पण वाणीवर थोडा संयम ठेवा. वाणी व लेखणी तलवारीसारखी धारदार असते. ती खूप सांभाळून वापरावी लागते. आपल्या वाणीने कुणाचे मन दुखवू नका. एवढे सांभाळलेत तर हा आठवडा उत्तम जाईल.

उपाय -दत्त उपासना करा.

मकर

हा आठवडा आपल्याला चांगला जाईल. आपले मित्र, छोटी भावंडे यांची काही निमित्ताने भेट होण्याची शक्मयता आहे. आपल्या नोकर चाकरांची आपल्याला चांगलीच मदत होईल. मिष्टान्न भोजनाचा लाभ होईल. कुटुंबीयांसमवेत छोटासा प्रवास घडेल. पण प्रवासात थंड वाऱ्यामुळे कानाला इजा होण्याचा संभव आहे. त्यामुळे कानाला जपा

उपाय : गुरुची आराधना करा.

कुंभ

मातेच्या प्रकृतीची काळजी घ्या. मातेचे सुख मिळेल. वाहन सौख्य लाभेल. मन शांत ठेवून कामाला लागा. स्थावर मालमत्तेमध्ये लाभ होण्याची शक्मयता आहे. पण थोडा विलंब लागेल. थोडे कष्ट सहन करावे लागतील. संयमाने काम कराल तर स्वत:ची प्रगती करून घ्याल. हा आठवडा ठीक जाईल.

उपाय : लक्ष्मी पूजन करा. 

मीन

पदव्युत्तर अभ्यासात यश मिळण्याची शक्मयता आहे. अभ्यासाला लागा. मुलांच्या अभ्यासात व त्यांच्या इतर छंदाकडे लक्ष द्या. आजकाल अनेक प्रलोभने वाढली आहेत. आपण सतर्क राहून मुलांना सावध करण्याची नितांत गरज आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे. पण तो योग्य मार्गाने मिळायला हवा याची काळजी घ्या.

उपाय:  होईल तेवढा दानधर्म करा.

Advertisement
Tags :

.