For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशी भविष्य

06:01 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
राशी भविष्य
Advertisement

तुमचे ग्रह आणि तुमचाच अंदाज!!! (भाग-3)

Advertisement

विवाहाच्या बाबतीमध्ये मंगळाचा बाऊ करताना पाहण्यात येते. ज्याप्रमाणे आजच्या काळामध्ये नाडी दोष बघण्याची गरज नाही (म्हणजे एकनाड)  कारण नाडी ही बहुसंतती करता पाहण्यात येते. पूर्वीच्या काळामध्ये दहा-बारा मुले असणे हे काही विशेष नव्हते. आयुर्मानाचा  प्रश्न असल्याने म्हणजे वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने दहा-बारा पोरांपैकी काहीच मुले जगायची, त्यावेळेला नाडी हा प्रकार महत्त्वाचा होता.

आजकाल एक किंवा जास्तीत जास्त दोन संतती असणे म्हणजे डोक्यावरून पाणी! अशा वेळेला बहुसंततीसाठी नाडी बघण्याची गरजच नाही. त्याचप्रमाणे मंगळाचा अति बाऊ करणे हेही योग्य नाही. मुळात मंगळ सेक्सुअल एनर्जीचा कारक आहे. तुमच्या कुंडलीतील मंगळ तुम्हाला कशी फळे देतो आहे हे तुमच्या स्वभावावरून आणि तुमच्या बरोबर घडणाऱ्या घटनांवरून, लक्षणांवरून सहज समजू शकते. मंगळ हा भूमीचा  कारक असल्याने संपत्तीसंबंधी विवाद असतील किंवा स्थावर संपत्ती होत नसेल, घराचे स्वप्न पाहत आहात पण घर होण्याचा योगच येत नाही. भावंडांबरोबर वादविवाद होत असतील, रक्ताशी संबंधित एखादा रोग जडला असेल, शरीरातील उष्णता प्रमाणाबाहेर वाढत असेल आणि त्यामुळे त्रास होत असेल, वारंवार अॅसिडिटीचा किंवा गळवे-फोड येण्याचा त्रास असेल, कोर्टकचेऱ्या मागे लागलेल्या असतील, इतरांशी वारंवार खटके उडत   असतील, स्वभाव हिंसक होत असेल, एखादे शस्त्र कायम जवळ ठेवावे असे वाटत असेल, आत्मविश्वासाच्याबाबतीत तुम्ही कमी पडत असाल, स्वभाव भित्रा झाला असेल, मनात कायम ईर्षा, बदला घेण्याचे विचार येत असतील, कोणतीही नवी सुऊवात करायला मन धजावत नसेल, नवीन लोकांशी बोलत असताना घाबरत असाल, आरोग्य ठणठणीत असूनसुद्धा  कायम थकवा जाणवत असेल, अति अहंकार असेल, ताकद कमी आणि राग जास्त असेल, अति राग राग केल्याने लोकांशी संबंध खराब होत असतील, पित्ताशयात खडे झाले असतील, भावंडांकडून आणि मित्रांकडून धोका होत असेल, पुऊषत्वात कमी आली असेल, किंवा विकृत मन:स्थिती असेल या अशा काही लक्षणांवरून तुमच्या कुंडलीतील मंगळ खराब आहे की नाही हे कळू शकते. यावर उपाय काय करायचे हे पुढच्या वेळेला सांगतो.

Advertisement

मंगळावर हमखास उपाय म्हणजे भूमीची सेवा करणे. काही लोकांना येता, जाता थुंकण्याची सवय असते. काही लोक जे सिगारेट ओढतात ते  सिगारेटचे थोटके ज्यात अग्नी असतो ते पायाने विझवतात, असे लोक स्वत:च्या कर्माने आपला मंगळ खराब करून घेत असतात. सकाळी उठल्याबरोबर भूमीला वंदन करणे आणि जमिनीवर डोके टेकून नमस्कार करणे याने खराब मंगळ चांगला व्हायला सुऊवात होते. भावा-बहिणींशी चांगल्या पद्धतीने वागल्यास, त्यांना समजून घेतल्यास, त्यांची मदत केल्यास मंगळ चांगला व्हायला सुऊवात होतो. जे लोक धडधाकट आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारचे आजार नाहीत त्यांनी वर्षातून एकदा तरी रक्तदान करावे, करण्याचा प्रयत्न तरी करावा. हा खराब मंगळावरचा रामबाण उपाय आहे.  सुरक्षाकर्मींना योग्य तो सन्मान दिल्याने मंगळ चांगली फळे द्यायला सुऊवात करतो. अतितिखट किंवा मसालेदार उग्र पदार्थांचे सेवन कमी केल्याने, नॉनव्हेज कमी केल्याने मंगळाची वाईट फळे मिळणे कमी होते. पुऊषांनी उजव्या मनगटात आणि स्त्रियांनी डाव्या मनगटात लाल रंगाचा (यात काळा किंवा पिवळा रंग अजिबात नसावा) गोप बांधल्याने मंगळ बलवान होऊ शकतो. लाल वस्त्र, लाल मसुरीची डाळ, लाल चंदन, पोवळे दान दिल्याने खराब मंगळ चांगली फळे द्यायला सुऊवात करतो..

मेष 

आरोग्यात चढउतार संभवतो. अपेक्षेप्रमाणे धनप्राप्ती होणे थोडे कठीण दिसते.  कौटुंबिक वाद विवादाला सामोरे जावे लागू शकते. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. जमिनीचा व्यवहार सावधानतापूर्वक करावा. इन्व्हेस्टमेंट करता चांगली वेळ आहे. नोकरदार वर्गाला फायद्याचे दिवस असतील. व्यवसायिकांना उत्तम लाभ संभवतो. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील.

उपाय : उडीद दान द्यावे

वृषभ 

तब्येतीची काळजी घ्या, संसर्गजन्य आजार त्रास देऊ शकतात. लहान भावंडांशी  वादविवाद संभवतो. प्रवास शक्मयतो टाळावा. प्रॉपर्टीच्या संदर्भात असलेले वाद विवाद कमी होतील. घर घेण्याची इच्छा असेल तर पूर्णत्वाला जाऊ शकते. प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. कलाकारांना चांगले दिवस असतील. मनोरंजनाकडे ओढ असेल. नोकरदार वर्गाने सावध रहावे.

उपाय : शुक्र ताऱ्याचे दर्शन घ्यावे

 मिथुन

या काळात कौटुंबिक कलह संभवतो. त्यामुळे शांतचित्ताने निर्णय घ्यावे. प्रवासाला जावे लागू शकते. भावंडांची मदत घ्यावी लागेल. स्थावर मालमत्तेसंबंधी अनुकूल काळ आहे. महत्त्वाची बातमी कळेल. कोणत्याही परिस्थितीत शेअर बाजार किंवा  जुगारापासून दूर रहा. भाग्याची उत्तम साथ आहे. तीर्थयात्रेचे योग बनत आहेत. मन धार्मिक होईल.

उपाय : तुळशीला  गंगाजल घालावे.

कर्क

तब्येतीला कोणत्याही परिस्थितीत जपावे लागेल. आजारपण त्रास देऊ शकते.  धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्तींचा सहवास प्राप्त होईल. लेखी व्यवहार यशस्वी होतील. भावंडांमुळे फायदा होईल. वाहन आणि स्थावर मालमत्तेसंबंधी निर्णय सध्या घेऊ नका. नोकरीमध्ये अकारण तणाव येईल. वैवाहिक जीवनात  थोडा वादविवाद होऊ शकतो.

उपाय : काळे वस्त्र दान द्या.

सिंह 

‘आरोग्यम् धनसंपदा’ हे आता तुमच्या लक्षात येईल. पैशांची आवक समाधानकारक असेल. या काळात उत्तम उत्तम खाद्यपदार्थावर ताव माराल. प्रॉपर्टीच्या कारणावरून भावंडांची नाराजी होऊ शकते. नोकरदार वर्गाला खास करून सावध राहण्याची गरज आहे. लहान चुकांना मोठे करून दाखवण्याचा प्रयत्न होईल. वैवाहिक जीवन  सुधारेल.

उपाय : गाईच्या खुराखालील माती जवळ ठेवा.

 कन्या

उत्साहामध्ये वाढ होईल. कोणतेही काम करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण होईल. धनप्राप्तीच्या बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे. जवळची व्यक्ती खोट्या स्कीमच्या नावाखाली फसवू शकते. प्रॉपर्टीसंबंधी कामे पुढे ढकला.   नोकरदार वर्गाला प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळेल. कामाचे कौतुक होईल.   वैवाहिक जीवनात तणाव असेल.

उपाय : मारूती मंदिरात चार वातीचा दिवा लावा.

तूळ

तब्येत नाजूक राहील. पथ्यपाणी सांभाळावे. धनप्राप्ती सर्वसाधारण असेल. गैरसमजांमुळे नुकसान होऊ शकते. प्रॉपर्टीच्या व्यवहारात सावध रहा. कलाकारांना आणि खेळाडूंना अनुकूल काळ आहे. प्रेमसंबंध वृद्धिंगत होतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतो. कोणीही आपले नाव खराब करू नये, याची काळजी घ्या.

उपाय: देवीला लाल फुलांची माळ अर्पण करा.

वृश्चिक 

जो निर्णय घ्यायचा असेल तो ठामपणे घ्यावा. तब्येतीची विशेष काळजी करण्याचे कारण नसले तरीही पथ्यपाणी सोडू नये. काम लवकर पूर्ण होईल असे वाटत असताना कामामध्ये विलंब होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या तब्येतीविषयी काळजी वाटेल. भावंडांबरोबरचे संबंध थोडे बिघडू शकतात.   बोलताना योग्य शब्दांचा वापर करावा.

उपाय : तुळशीच्या सात परिक्रमा करा.

धनु 

आरोग्याला सांभाळा. अति ताण घेण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. टेन्शन घेण्याचे कुठलेही कारण नसताना उगाच टेन्शन घेण्याची सवय टाळावी.   पैशांच्या बाबतीत सावध रहावे. यात्रेचा योग आहे. प्रॉपर्टीसंबंधी कामे जपून करा.   नोकरदारवर्गाने कामात चूक होऊ नये याची काळजी घ्यावी. मान-प्रतिष्ठा प्राप्त होईल.

उपाय : घरातील देवासमोर तुपाचा दिवा लावा

 मकर

या काळात मूड थोडासा नाराजीचा असू शकतो. मित्रांमुळे एखाद्या गोष्टीबद्दल  त्रास होण्याची शक्मयता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी जास्त कष्ट घ्यावेत. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्तींमुळे आनंद मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये लहान-सहान कारणावरून वादविवाद संभवतात. अपघातापासून सावध रहा.

उपाय : मारूतीचा शेंदूर जवळ ठेवावा.

कुंभ 

उत्साहवर्धक काळ आहे. ज्या कामामध्ये हात घालाल त्यामध्ये यश मिळेल. पण आर्थिक प्राप्ती थोडी उशिरा होईल. प्रवासाचे बेत आखाल. नोकरदार वर्गाला जास्तीच्या कामांचा सामना करावा लागेल. त्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. एकमेकाला मदत कराल. या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो.

उपाय : शंकराला दीड  प्रदक्षिणा घालावी.

मीन 

आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरेल. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.   धनप्राप्तीचे योग आहेत. प्रवास करताना सांभाळून रहा. कोणत्याही प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला प्रमोशन, इन्क्रिमेंट आणि कौतुक प्राप्त होईल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

उपाय : लक्ष्मी नारायणाचे दर्शन घ्यावे.

Advertisement
Tags :

.