For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशी भविष्य

06:01 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
राशी भविष्य
Advertisement

           खजाना - 29- 11-2023 ते 5-12- 2023     

Advertisement

  क्र.             विशेष                        तारीख

  1. शुभ दिवस   1,2,5,6,8,14, 15, 17,18,21,25, 27, 31
  2. अशुभ दिवस              4,11,12,23,24
  3. सण/उत्सव/विशेष तिथी ता.5 कालभैरव जयंती            ता. 8 स्मार्त एकादशी, 9 भागवत एकादशी, 13 देव दीपावली ता. 22 स्मार्त एकादशी, 23 भागवत एकादशी, ता.25 ख्रिसमस, 26 दत्त जयंती, ता. 30 संकष्टी चं.21.9
  4. अमावास्या/पौर्णिमा ता.11-12-23 उ.रात्री 6.24 ते 12-12-23 उ. रात्री 5.1 पर्यंत अ. था. 25-12-23 उ. रात्री 5.46 ते 26-12-23 उ. रात्री 6.1 पर्यंत पौ.

5.साखरपुड्याचे मुहूर्त 6 तारखेस स. 7 ते दु.4 प.,ता. 8 ला स. 10 ते 11. 30 प., ता. 15 ला स. 8 नंतर, ता. 17 ला व 20 ला दु.4 नं ता. 21 ला दु. 1.30 प. था. 22 सायं. 7.30 प.

Advertisement

  1. बारसे(नाव ठेवण्याचे)मुहूर्त ता.1-4 नंतर, 2-5 पर्यंत, 7- 4 प., 15, 17 ा 6 प. 18- 3 नंतर

7.जावळाचे मुहूर्त 1, 7, 8, 17, 18, 21, 22

  1. भूमिपूजनाचे/पायाभरणीचे मुहूर्त 2,14,15,18,27

9.गृहप्रवेशाचे(व्यवहारीक)मुहूर्त, ता. 2- स. 8.12, 9.5, 9.47, दु.1.53, 2.25, ता.7-स 8.2, 9.27, दु.2.5, ता.8-स.7.58, 9.23, दु.2.1

  1. वास्तुशांतीचे(व्यवहारीक) मुहूर्त ता. 2-सायं. 4 प., ता.7- सायं 4 प., ता. 8- सायं 4 प., ता.14-स. 9.46 प. ता.18 सायं 4 प.,21 स 9.37 ते दु.1.26 प.
  2. व्यापार सुऊ करण्याचे मुहूर्त 3, 6, 8, 10, 15-8. 15 प. 18, 21- स. 10 ते दु 1.11 प.23

12.वाहन खरेदीचे मुहूर्त 1,7,8,10,17,18,21,24,29

13.शेत/जमीन/जागा/प्रोप./फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त 2, 3, 12, 13, 21, 26, 27, 31

  1. शेतीच्या कामासाठी उपयुक्त दिवस ता.2-सायं 5 प., ता. 3, 6, 7, 8, 14, 17, 18, 20, 24, 27, 31 दु.12 नंतर.

15.डोहाळे मुहूर्त 1, 13, 22, 26

16.पंचक रवीवार 17-12-2023 दु 3.46 ते गुऊवार 21-12-2023 रात्री 10.09 प.

मेष

अवघड परिस्थितीतून मार्ग काढाल. पार्टनरकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. आपला काही छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्यातून प्राप्ती चांगली होईल. वादविवादात मात्र पडू नका. त्यामुळे तुमचेच नुकसान होईल.

उपाय : इष्टदेवतेची आराधना करा.

वृषभ

वारसा हक्कामुळे अथवा लॉटरीमुळे द्रव्य मिळण्याची शक्मयता आहे. पण काहीतरी मानसिक चिंता सतावेल. विरस होण्याची शक्मयता आहे. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.

उपाय: मुक्या जनावरांना खाऊपिऊ घाला.

मिथुन

प्रवास घडण्याची शक्मयता आहे. धार्मिक कार्य घडेल. वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. किरकोळ दुखापत होण्याची शक्मयता आहे. एकूण आठवडा चांगला जाईल.

उपाय : गाईला खाऊ घाला.

कर्क

नोकरी, व्यवसायात प्रगतीच्या संधी येतील. कर्ज मिळण्यासाठीच्या प्रयत्नात असाल तर मिळण्याची शक्मयता आहे. मानमरातब मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील.

उपाय : पिंपळाला प्रदक्षिणा घाला.

सिंह

अचानक पैसा मिळण्याची शक्मयता आहे. वडील भावंडांचे सहकार्य लाभेल. शत्रूंचा परस्पर बीमोड होईल. मित्रांच्या सहाय्याने एखाद्या समारंभाची आखणी कराल.

उपाय : सूर्याला अर्घ्य द्या.

कन्या

तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चाचा ताळमेळ सांभाळावा लागेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्याचा माफक आस्वाद घ्या. त्यामुळे तब्येतीची हेळसांड होणार नाही.

उपाय : तुळशीला पाणी घाला.

तूळ

उत्साही रहाल. समाधानी रहाल. तब्येत समाधानकारक राहील. मुलांच्या कर्तृत्वाने अभिमान वाटेल. विचार चांगले ठेवा. आचार विचारांचा ताळमेळ घालायचा प्रयत्न करा.

उपाय : मुक्या जीवांना खाऊ घाला.

वृश्चिक

कुटुंबातील व्यक्तीकडून चांगली वार्ता मिळेल. पण वाणीवर संयम ठेवा. खटके उडण्याची शक्मयता आहे. दादागिरी नको. कुटुंबाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. शांत रहा. नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करा.

उपाय : लक्ष्मीपूजन करा.

धनु

एखादा छोटा प्रवास घडण्याची शक्मयता आहे. आपल्या हुशारीचे कौतुक होईल. लहान भावंडांचे सहकार्य मिळेल. एखाद्या कार्यात धाडस दाखवाल. हाती घ्याल ते कार्य तडीस न्याल.

उपाय : नामस्मरण करा.

मकर

आईचे कोड कौतुक कराल. नवीन वाहन घेण्याची शक्मयता आहे. स्थावर मालमत्तेविषयी चर्चा विचारविनिमय कराल. एखादी नवीन विद्या शिकण्याची इच्छा होईल.

उपाय : गाईचे पूजन करा.

कुंभ

मुलांच्या प्रगतीने आनंद होईल. अचानक धनलाभाची शक्मयता आहे. समोर आलेल्या अडचणींवर चातुर्याने मात कराल. तुमची मूलत: असलेली चिकित्सक वृत्ती उफाळून वर येईल.

उपाय : इष्टदेवताची उपासना करा.

मीन

तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. शत्रूंचा त्रास होण्याची शक्मयता आहे. सांभाळून रहा. कोणती ना कोणती चिंता सतावत राहील. पण चिंता केल्याने तब्येतीवर परिणाम होईल, हे समजून घ्या.

उपाय : नामस्मरण करा.

Advertisement
Tags :

.