राशी भविष्य
26-11-2023 ते 2.12.2023 पर्यंत
मेष
तुमच्या कुटुंबात विवाहयोग्य सदस्य असेल तर त्याच्या/तिच्या लग्नाची चर्चा होऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील वातावरण शुभ आणि मंगलमय राहील. आज संध्याकाळी तुमच्या घरी विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पैसे खर्च आणि कामे दोन्ही वाढू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही वेळ एकांतात घालवाल, ज्यामध्ये तुम्ही भविष्यातील काही योजनांवरही चर्चा करू शकता.
पिंपळाला पाणी घाला.
वृषभ
कार्यक्षेत्रात काही बदल करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यातही फायदा होईल. आज तुम्ही व्यवसायात नफा मिळविण्यासाठी अधिक मेहनत कराल, परंतु तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुम्हाला अपेक्षित तेवढा नफा मिळणार नाही, ज्यामुळे तुम्हाला निराशा वाटेल. आपल्या मनातील गोष्टी योग्य त्या माणसाकडेच व्यक्त करा.
धार्मिक स्थळातील झाडाला पाणी घाला
मिथुन
कोणी तुमची स्तुती करत असेल तर तुम्हाला त्याबाबतही काळजी घ्यावी लागेल. एखादी वस्तू हरवल्यामुळे किंवा वेळेवर न सापडल्यामुळे त्रास होईल. लेखी व्यवहार करत असताना सावध रहा. आपले म्हणणे योग्य असूनसुद्धा घरातील व्यक्ती ऐकत नाहीत याचा त्रास होईल. कामाचा वेग वाढवावा लागेल. दुसऱ्याच्या म्हणण्याचा विपर्यास करू नका.
पिंपळाला पाणी घाला.
कर्क
भागीदारीत कोणताही व्यवसाय केला असेल तर तुमच्या जोडीदारावर जास्त विश्वास ठेवू नका. असे केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तीला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर ते परत मिळण्याची शक्मयता खूपच कमी आहे. प्रवासाला जाताना तब्येतीविषयी शंका वाटेल.
तृतीयपंथीयाचा आशीर्वाद घ्या
सिंह
ऑफिसमध्ये काम तुम्ही करावे आणि व्रेडिट दुसऱ्याला मिळावे अशी काहीशी परिस्थिती असू शकते. जुन्या मित्राची भेट घेऊन आनंद वाटेल. एखाद्या ट्रिपच्या योजना बनवाल. पोटासंबंधी तक्रारी वाढू शकतात. तुमच्या जीवनसाथीसोबत काही दैनंदिन गरजांवर चर्चा कराल. संध्याकाळी खरेदीलाही जाण्याचा बेत कराल.
हिरवे पेन वापरा
कन्या
तुम्हाला तुमच्या मनात निराशाजनक विचार येण्यापासून थांबवावे लागेल, तरच तुम्ही तुमच्या मनाने योग्य गोष्टी करू शकाल आणि लाभाच्या संधी ओळखू शकाल. तुमचा व्यवसायात एखाद्याशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे मानसिक तणावही निर्माण होईल. घरातील काही सदस्यांच्या वागण्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो.
पिवळ्या वस्तू दान करा
तूळ
आत्मविश्वासामध्ये वाढ होऊन करत असलेल्या कामात यश मिळण्याची दाट शक्मयता आहे व्यावसायिकांना चांगल्या संधी प्राप्त होतील नोकरदारांना नवीन बदलांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायासाठी तुम्ही सल्ला घेऊ शकता. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
हळदीची गाठ जवळ ठेवा.
वृश्चिक
अनेक कामांपैकी आपल्या मुख्य कामांकडे जास्त लक्ष द्या. एखाद्या मेसेजमुळे किंवा फोन कॉलमुळे मन उदास होऊ शकते. काम तुम्ही करू शकता याचा विश्वास वाटेल. अनेक कामे दीर्घकाळासाठी पुढे ढकलली जाऊ शकतात. नवीन व्यक्तीच्या संपर्कात आल्याने फायदा होईल अशी शक्मयता आहे.
धार्मिक स्थळी दीपदान करा
धनु
चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात एखादी अनामिक भीती त्रास देऊ शकते. कामाच्या ठिकाणीही तुमचा बॉस तुमची प्रशंसा करताना दिसेल, ज्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. प्रयत्नांना यश येईल. जे लोक नवीन कामाकरता प्रयत्न करत आहेत त्यांना आशेचा किरण दिसू शकतो.
गुलाबाचे अत्तर लावा
मकर
कामाच्या ठिकाणी तुमच्या म्हणण्याचा वेगळाच अर्थ निघून मनस्ताप होण्याची शक्यता आहे पण ज्या कामात हात धराल त्या कामात यश मिळेल. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणतीही अडचण आली तर कुटुंबातील सर्व सदस्य पुढे येऊन उभे राहतील, त्यामुळे कौटुंबिक एकता टिकून राहील.
केळीच्या झाडाला पाणी घाला
कुंभ
आपल्या वाणीवर आणि भावनांवर ताबा ठेवावा लागेल. या आठवड्यात एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळालेला सल्ला फायदेशीर ठरू शकतो. आपल्या मनातील गोष्टी योग्य त्या माणसाकडेच व्यक्त करा. तुमच्या काही समस्या खऱ्या असतील, परंतु काही निऊपयोगी असतील. घरातील एखाद्या व्यक्तीशी वाद-विवाद संभवतो. गाईला गोड चपाती घाला
मीन
भविष्यासाठी पैसे गुंतवण्यासाठी कठोर योजना बनवावी लागेल. नको त्या प्रसंगाला तोंड देताना आपल्या वाणीवर आणि भावनांवर ताबा ठेवावा लागेल. कामाचा वेग वाढवावा लागेल. दुसऱ्याच्या म्हणण्याचा विपर्यास करू नका. पैशाचा व्यवहार करत असताना सावध राहणे योग्य ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत सापडू शकता. हळदीची गाठ जवळ ठेवा.
टॅरो उपाय:
घरात काही निगेटिव्ह एनर्जी असल्यास (बाधा इत्यादी) एका काचेच्या भांड्यात मीठ घेऊन त्यावर नऊ न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या ठेवाव्यात. त्यावर काळी मेणबत्ती पेटवून ठेवावी. मेणबत्ती पूर्ण जळून जाईपर्यंत विझू देऊ नये. हा उपाय दर अमावास्येला करावा