महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशी भविष्य

06:05 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष

Advertisement

या आठवड्यात धावपळ वाढणार आहे.  सोबत काम करणाऱ्या लोकांवर अती विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याने घेतलेला निर्णय पटेलच असे सांगता येत नाही अशावेळी अविश्वास न दाखवता सपोर्ट देणे गरजेचे असेल. कामकाजा संबंधी गोष्टी गुप्त ठेवलेल्या बऱ्या.

Advertisement

पिवळी फुले पाण्यात सोडावी

वृषभ 

घरात उत्साहाचे वातावरण असेल.  ज्ञान पुष्कळ आहे पण इतरांना त्याचा फायदा जास्त होतो आणि तुम्हाला हाती काहीच लागत नाही . या आठवड्यात काही वेळेला कन्फ्य?जन होण्याची शक्मयताही नाकारता येत नाही. कुठला निर्णय बरोबर आणि कुठला चूक याचा निर्णय स्वत: घ्यावा, इतरांचे मत हावी होवू देऊ नये.

केळीच्या झाडाला पाणी घालावे

मिथुन

कामे पूर्ण होण्याकरता जेष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल.   या आठवड्यात सुरुवातीलाच कामांचा व्याप जास्त असेल. आठवड्याच्या मध्याला एखादी चांगली बातमी कळल्यामुळे मन प्रफुल्लति होऊ शकते.  वैवाहिक जोडीदाराला  तुमची मदत लागेल. व्यावसायिकांना अनुकूल वेळ आहे.

दिवसाची सुरुवात गुळ खाऊन करावी

कर्क 

व्यावसायिकांना थोडे असमाधान वाटण्याची शक्मयता आहे. विद्यार्थी वर्गाला यश प्राप्ती करता कठोर परिश्र्रम घ्यावे लागतील. या काळात स्वत: करता वेळ काढणे गरजेचे असेल नाहीतर मानसिक तणाव येऊ शकतो. आपल्या छंदांकडे किंवा आवडी?कडे लक्ष द्या त्यामुळे तणाव कमी होईल.

बाळ लोकरीचा छोटा तुकडा जवळ ठेवावा

सिंह 

घरामध्ये आणि ऑफिसमध्ये आनंदाचे वातावरण असेल.   ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला ऐकला आणि ज्येष्ठांना मान देऊन कामे केली तर आर्थिक लाभ उत्तम होईल. घरातील एखाद्या सदस्याच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. या काळात प्रवास घडण्याची शक्मयताही आहे. कामाकरता प्रवास करत असाल तर कागदपत्रांची विशेष काळजी घ्या.

जलचरांना खाद्य घालावे

कन्या

आनंदाच्या भरामध्ये कोणालाही वचन देण्याच्या भानगडीत पडू नका.  आपले काम अचूक असेल आणि ते दुसऱ्यांच्या नजरेत येईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्नायू संबंधित तक्रार येऊ शकते. नवीन एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ आहे. लेखी व्यवहारात सावध राहिल्यास फायदा होईल.

लाल रुमाल जवळ ठेवावा

तूळ

आकांक्षापूर्तीचा  काळ आहे.   दूरच्या नातेवाईकांशी   भेटीगाठी होतील.   या आठवड्यामध्ये बऱ्याच लोकांना भेटावे लागणार आहे. तब्येतीच्या दृष्टीने विशेष काळजी करण्याचे कारण नाही. या काळात तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल संभवतो. कामाच्या ठिकाणी काही कामांमध्ये इतरांची मदत लागेल.

डाव्या अंगठ्याच्या खाली हिरव्या पेन ने 24 लिहा

वृश्चिक

आठवडा धार्मिक किंवा आध्यात्मकि कामाकरता उत्तम असेल.  एखाद्या व्यक्तीकडून आश्चर्यजन्यरित्या मदत प्राप्त होऊ शकते. जुना मित्रांची भेट गाठ होईल. आठवड्याच्या मध्यानंतर कामांचा व्याप वाढण्याची शक्मयता आहे त्यामुळे पूर्व नियोजन गरजेचे असेल. समाजामध्ये चांगले नाव होईल.

लहान मुलांना आंबट गोड मिठाई वाटावी

धनु 

आनंदाच्या काळामध्ये टेन्शन  येण्याची शक्मयता आहे. हा आठवडा चांगल्या वाईट अनुभवांना इग्न?र न करता नवीन काहीतरी शिकण्याकरता उत्तम असेल. काही मित्रांकडून किंवा जवळच्या लोकांकडून अपेक्षा भंग होऊ शकतो.  आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात काळजीपूर्वक राहिलेले बरे.

सरकारी जमिनीवरील 5 झाडांना पाणी घालावे

मकर

घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. तुमच्या मेहनतीचा योग्य परतावा तुम्हाला प्राप्त होईल. या आठवड्यात काही संधी अशा प्राप्त होतील ज्यामुळे भविष्यातील काही योजना प्रत्यक्षात आणू शकाल. वैवाहिक जोडीदार सरप्राईज गिफ्ट देईल ज्यामुळे खुश व्हाल. तब्येत सुधारण्याकरता प्रयत्न करण्यासाठी योग्य वेळ आहे.

हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी

कुंभ

अनेक योजना सफल होतील. आनंदाची बातमी  कळण्याची शक्मयता आहे.   कुटुंबातील वातावरण  सुधारेल. या आठवड्यात भावनांपेक्षा बुद्धीला जास्त महत्त्व द्या.  कौटुंबिक वातावरण हळवे असेल. टेंशन असलेल्या परिस्थितीत घाबरण्याचे कोणतेही कारण नाही हे लक्षात ठेवा.  व्यावसायिकांना तेजी अनुभवायला मिळेल.

हळदीचे पाणी पिंपळाला घालावे

मीन 

खर्चावर नियंत्रण ठेवल्यास  आर्थिक  प्राप्ती चांगली असेल.   मनातील योजना दुसऱ्यांना सांगण्याच्या भानगडीत पडू नका.    सगळ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा निवडक लोकांवर विश्वास ठेवा.   ऐकावे जनाचे करावे मनाचे  असे धोरण ठेवा. तुमचे वागणे बोलणे योग्य असले तरी समोरचा कसा बघेल हे सांगता येत नाही.

कामाच्या संदर्भात अनेक चॅईस  असतील. अन्नदान करा

आर्थिक भरभराट होण्याकरता  आणि नशिबाची साथ मिळण्याकरता  हा जो उपाय आहे हा आजच करायचा आहे.   आजच्या दिवशी  घरात पालीचे दर्शन होणे  हे अत्यंत शुभ असते.   त्यात जर पालीवर  थोडे हळद-कुंकू घातले  तर वर्षभर नशीब साथ देईल,  आर्थिक  सुबत्ता  प्राप्त होईल

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article