For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

White Frog : झाड अन् भिंतीवर चढणार दुर्मिळ जातीचा स्पायडरमॅन बेडूक पाहिलात का?

01:47 PM May 16, 2025 IST | Snehal Patil
white frog   झाड अन् भिंतीवर चढणार दुर्मिळ जातीचा स्पायडरमॅन बेडूक पाहिलात का
Advertisement

आनंदा राडे यांना हा पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ बेडूक दिसून आला

Advertisement

भिलवडी : आमणापूर (ता. पलूस) येथील वेताळपेठ येथील फोटोग्राफर आनंदा राडे यांच्या स्टुडिओत दुर्मीळ पांढरा बेडूक आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. आनंदा राडे यांना हा पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ बेडूक दिसून आला. या बेडकाला 'झाड बेडूक' असेही म्हणतात.

याबाबत आंबोली येथील अभ्यासक काका भिसे यांच्याकडून या प्रजातीची खात्री करण्यात आली. भिसे म्हणाले, दुर्मीळ पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो. जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो. सदर बेडूक नैसर्गिकरीत्या पांढरा असतो.

Advertisement

राडे यांनी या बेडकाला सुरक्षित रित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. क्वचितच आढळून येणारा इंडियन कॉमन ट्री प्रजातीच्या दुर्मीळ बेडकाची प्रथम १८३० मध्ये जॉन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी जास्त दिसतो.

या बेडकाला 'चुनाम' या नावानेही ओळखले जाते. तर संस्कृतमध्ये याला 'चुर्ण' असे म्हटले जाते. जंगलात किंवा एखाद्या गवात झाड आणि ओलावा असेल तर हे बेडूक येतात. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एक झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो.

बेडकांच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात. ते बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वतःचा बचाव करतात. त्यामुळे असे बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे याचे खाद्य असून हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे

Advertisement
Tags :

.